Wednesday, November 18, 2026
Home › बॉलीवूड › रामायणने 13 व्या दिवशी भारतात 821.30 कोटींचा टप्पा पार करत, जगभरात इतक्या कोटींच्या केली वाटचाल

रामायणने 13 व्या दिवशी भारतात 821.30 कोटींचा टप्पा पार करत, जगभरात इतक्या कोटींच्या केली वाटचाल

रणबीर कपुर अभिनीत रामायण हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी रीलीज झाला होता आणि आता हा चित्रपट बॅाक्स ऑफिस वर उत्तम कमाई करत आहे, या चित्रपटाला रिलीज होउन जवळपास 11 दिवसांनपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. रोजच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली असली तरी तो आताही एकुण बाॅक्स ऑफीस कमाई उत्तम दिसत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या रवीवारी पण आपली पकड कायम ठेवत 75 कोटींहुन आधिक कमाई केली होती. तर या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 1500 कोटींच्या जवळ पोहोचली आहे.

नवीन व्यापार आकडेवारीनुसार, चित्रपटाने 13 व्या दिवशी भारतातील 22,551 शोमधुन 28.70 कोटी रुपयांची नुव्वळ कमाई केली. यामध्ये हिंदी शोचा वाटा सर्वाधिक होता, ज्यांनी 17,867 शो मध्ये 21 कोटी रु कमावले. आणि इतर भाषेतुन मिळाले, यामुळे ‘रामायण’ची भारतातील एकूण निव्वळ कमाई 821.30 कोटी झाली आहे, तर भारतातील त्याचे एकूण कलेक्शन 981.50 कोटींवर पोहोचले आहे.

तसेच रामायण (Ramayan)चित्रपटाने आतापर्यत भारतात 310.20 कोटी निव्वळ कमाई केली आहे. त्याची जगभरात एकुण कमाई 1500 कोटींच्या जवळ पोहोचली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटांने उत्तम कमाई करत असुन, या चितपटाने या आठवड्यात जगभरातील IMDBच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट यादीत तिसरे स्थानही मिळवले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने रामाची, साई पल्लवीने सीतेची आणि यशने रावणाची भूमिका साकारली आहे. तसेच हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

हेही वाचा

समय रैनाने हुमा कुरैशीला बॅाक्स ऑफिसवरून डिवचले, इंडियाज गॅाट लेटेंट मध्ये अभिनेत्रीचा पलटवार

 

हे देखील वाचा