Wednesday, June 26, 2024

“आधुनिकता आणि पौराणिक कथांच्या..”,’आदिपुरुष’ चित्रपटावर अरुण गोविल यांनी सोडलं मौन

प्रभास आणि क्रिती सेनॉनचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून त्या चित्रपटावर सातत्याने टीका होत आहे. काही लोकांना रावणाचे रूप आवडले नाही तर काहींना हनुमानजींची भाषा टपोरीसारखी वाटली आहे. त्याचवेळी काही लोक रामायणातील दृश्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता हळूहळू याबाबत प्रतिक्रिया  उमटल्या जात आहेत. आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये ‘राम’ची भूमिका अभिनेते अरुण गोविल यांनी साकरली होती. त्यांनी ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’वर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अरुण गोविल (Arun Govil) म्हणाले की, “रामायण हा आपल्यासाठी खूप श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे. त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड स्वीकारता येणार नाही. रामायणाबद्दल आधुनिकता किंवा पौराणिक कथांबद्दल बोलणे फार चुकीचे आहे. चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स आणि सादरीकरणाची बाब वेगळी आहे. परंतु पात्रांना योग्य पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे, तरीही त्याबद्दल चाललेल्या गोष्टी चिंतेचा विषय आहेत.”

पुढे बोलताना अरुण गोविल म्हणाले की, “आधुनिकता आणि पौराणिक कथांच्या चौकटीत राम, सीता आणि हनुमानाची विभागणी करणे चुकीचे आहे. ‘आदिपुरुष’मध्ये रामायणाची कथा सादर करण्यापूर्वी निर्मात्यांना ते लोकांच्या श्रद्धेच्या विषयाशी संबंधित रामायण कसे सादर करणार आहोत याचा विचार केला पाहिजे होता.”

तसेच, चित्रपटातील संवादांनाही प्रेक्षकांचा जोरदार विरोध होत आहे. याबाबत बोलताना अरुण गोविल म्हणाले की, “अशी भाषा चांगली वाटत नाही. मी नेहमीच संयमी भाषा वापरतो. त्यामुळे मी रामायणातील अशा भाषेचे समर्थन करत नाही. चित्रपटातील पात्रांना त्याच रूपात दाखवायला काय हरकत होती? तेव्हा एकच मुद्दा उपस्थित होतो की, मूळ भावनांशी खेळून निर्मात्यांना काय सिद्ध करायचे होते?”, असा सवाल अरुण गोविल यांनी उपस्थित केला आहे. (ramayan ram aka actors arun govil on actors prabhas adipurush controversy sayswhat makers want to prove mhnk)

अधिक वाचा-  
करण देओल अन् द्रिशा आचार्य अडकले लग्न बंधनात, नवीन जाेडप्याचे सुंदर फाेटाे एकदा पाहाच
तमन्नाच्या फोटोंनी चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एकदा फाेटाे पाहा

हे देखील वाचा