Monday, May 13, 2024

बाबो.! फ्लॅटमध्ये उरकलं आलिया-रणबीरचं लग्न, पण लग्नाचे फोटो-व्हिडिओ विक्रीतून कमावलेत ‘इतके’ कोटी

ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. अखेर आलिया भट्ट (Alia Bhatt) आता आलिया कपूर झाली आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट कायमचे एकमेकांचे बनले आहेत आणि आलियाचे रणबीर कपूरच्या बायकोत रूपांतर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दोघांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांसाठी आमच्याकडे अशी बातमी आहे, जी ऐकून त्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.

रणबीर आणि आलियाचे लग्न खासगी ठेवण्यात आले होते, कारण एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ स्ट्रीम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, रणबीरच्या टीमने याला दुजोरा दिलेला नाही आणि आलियाच्या टीमकडूनही कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (ranbir alia wedding footage rights sold in approx 110 crore rupees to stream on a ott platform)

एका रिपोर्टनुसार, येत्या काही महिन्यांत रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचे फुटेज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातील. इतकंच नाही, तर लग्नाचे व्हिडिओ आणि फोटोंचे हक्क आलिया आणि रणबीरने या ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठ्या रकमेत विकल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीरने त्यांचे लग्नाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९० ते ११० कोटी रुपयांना विकले आहेत.

सध्या तरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण तसं झालं तर नवल नाही, कारण रणबीर आणि आलियाची ब्रँड व्हॅल्यू इतकी जास्त आहे की, त्यांच्यासाठी ती फार मोठी गोष्ट नाही. आलिया आणि रणबीर निवडक चित्रपट करतात, पण त्या चित्रपटांसाठी दोघेही भरमसाट फी घेतात. या व्यतिरिक्त, दोन्ही ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील भरपूर कमाई करतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा