बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून रणबीर कपूरला ओळखले जाते. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपल्या शानदार अभिनयाने अनेक चित्रपट यशस्वी केले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे काय का, या कलाकाराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याअगोदर ऑस्कर नामांकित चित्रपटात काम केले आहे.
रणबीरने २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण त्याआधी अभिनेत्याने ‘कर्मा’ या, लघुपटात काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते बी. आर. चोप्रा यांचे नातू अभय चोप्रा यांनी केले होते. २००४ मध्ये रणबीरने, या चित्रपटात भूमिका केली होती. त्या काळात रणबीर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होता. चित्रपटाला स्टुडंट ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते.
‘कर्मा’ या २६ मिनिटांच्या लघुपटात, रणबीर कपूर व्यतिरिक्त शरद सक्सेना, मिलिंद जोशी, सुशोवन बॅनर्जी या कलाकारांनी काम केले आहे. अभय चोप्रा दिग्दर्शित, या चित्रपटाची कथा वडील, आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटात असे दर्शविले गेले आहे की, जेव्हा जेलरला त्याच्या मुलास देहदंडाची शिक्षा द्यावी लागते, तेव्हा त्याच्या मनाची झालेली घालमेल, भावना यांचे चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे. त्यावेळी हा लघुपट प्रदर्शित झाला नव्हता. पण आता हा चित्रपट ‘बांद्रा फिल्म फेस्टिव्हल’ च्या यूट्यूब वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
प्रसार माध्यमाशी बोलताना दिग्दर्शक अभय चोप्रा यांनी ऋषी कपूर, आणि नीतू सिंह यांच्या मुलाच्या कामाचे कौतुक केले आहे. अभय यांनी सांगितले की, ‘रणबीरच्या रक्तातच अभिनय आहे’. ‘बांद्रा फिल्म फेस्टिव्हल’ वर प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे अभय खूप खूश आहेत. ‘बांद्रा फिल्म फेस्टिव्हल’ हा कारवां आणि यूट्यूब यांचा सहयोगात्मक उपक्रम आहे. या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांची कामे डिजिटल व्यासपीठावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-