बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे, पण या आधी तिने सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. करण जोहरच्या ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटामधील अनुष्का – रणबीरच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंती दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. त्यानंतर या दोघांनी ‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटाला सफलता मिळाली नसली, तरी शूटिंग दरम्यान अनुष्का रणबीरच्या काही गोष्टींमुळे खूप त्रस्त झाली होती आणि सेटवरच रडायला लागली होती.
रणबीरने रडवले होते अनुष्काला
फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्काने या गोष्टीचा खुलासा केला होता. ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असे विचारल्यावर अनुष्काने सांगितले की, “रणबीर माझा मित्र आहे. त्याच्यासोबत काम करणे खूप सोपे आहे. त्याने मला त्रास दिलेलं मला आवडतं, पण सेटवर त्रास दिलेलं मला बिलकुल आवडत नाही.”
कंटाळून रडत होती अनुष्का शर्मा
अनुष्काने पुढे सांगितले की, ‘सेटवर मला बोलायला सुद्धा आवडत नाही. मी एका कोपऱ्यात बसून असते. तेव्हा रणबीरला वाटले की मी खूप मस्तीखोर आहे. तो माझ्याजवळ येऊन मस्ती करत होता. पण मला माझ्या सीनवर लक्ष द्यायचे होते. रणबीरच्या या गोष्टींना कंटाळून, मी एका कोपऱ्यात बसले आणि रडू लागले. त्यानंतर रणबीर माझ्याजवळ येऊन म्हणाला की, “मी शप्पत घेतो की, मी तुला कधीच त्रास देणार नाही.” (ranbir kapoor made anushka sharma cry on bombay velvet set)
थोड्याच वेळात शूट करायचा होता रोमँटिक सीन
अनुष्काने हे सुध्दा सांगितले की, तिला रणबीर सोबत भांडण करायचे नव्हते. कारण थोड्याच वेळात त्या दोघांना एक रोमँटिक सीन शूट करायचा होता. त्यानंतर सगळं काही सुरळीत पार पडलं. अनुष्का पुढे म्हणाली की, “मी रणबीरचा अभिनेता म्हणून खूप आदर करते.”
‘झीरो’ या चित्रपटात अनुष्का शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खास कमाई केली नाही. त्यानंतर अनुष्काने कोणताच चित्रपट साईन केला नाही. याच वर्षी जानेवारी महिन्यात अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला आहे. आता अनुष्का शर्मा मातृत्व एन्जॉय करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक