Tuesday, July 23, 2024

डेंग्यू झाल्यानंतर सलमाननं प्रकृतीबाबत दिली अपडेट; बीएमसीला इमारतीत सापडल्या डेंग्यूच्या अळ्या

बॉलिवूडचा भाईजान अर्थातचं सलमान खान(Salman Khan) याच्या प्रकृतीबाबत त्याचे चाहते सतत चिंतेत असतात. पण आता घाबरण्यासारखे काही नाही. सलमान खान आता बरा असून त्याच्या तब्येतीतही बरीच सुधारणा होत आहे. तब्येतीमध्ये आता सुधारणा झाल्यामुळे सलमान खान त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगवर काम करू शकतो. यासोबतच तो बिग बॉसचे शूटिंगही करू शकणार आहे. डेंग्यूची लागण झाल्यामुळे गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसला नाही. पण येत्या आठवडाभरात तो नक्कीच दिसणार आहे.

सलमान खानला डेंग्यूची माहिती मिळाल्यानंतर बीएमसीची टीम गेल्या काही दिवसांपासून अत्यंत सतर्क झाली होती. गॅलेक्सी अपार्चमेंटमध्ये बीएमसी टीमला दररोज औषध फवारणी आणि धूर मिळत आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरात औषध फवारणीही केली जात आहे. सलमान खानच्या अपार्टमेंटजवळ डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं माहिती झालं आहे. हे पाहिल्यानंतर ही पावले उचलली जात आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार इमारतीच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी अळ्या सापडल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

अलीकडेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी दिवाळीच्या पार्ट्यांचे आयोजन केले होते. यावेळी सलमान खान यावर्षी एकाही पार्टीमध्ये हजेरी लावली नाही. कारण डेंग्यू झाल्यामुळे आजारी होता. त्‍याच्‍या चित्रपटांचे शूटिंगही थांबवावे लागले. पण काल ​​रात्री डेंग्यूनंतर सलमान खान पहिल्यांदाच त्यांची झलक दिसली. त्यानंतर आता नुकतीच त्याने आयुष शर्माच्या वाढदिवाच्या पार्टीत हजेरी लावली. सलमान खानला लोकांमध्ये पुन्हा मिसळलेलं पाहून त्याच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला.

कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता बरा झाल्यानंतर अभिनेता पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याचवेळी सलमान खानला बिग बॉस वीकेंड का वारचे शूटिंगही करणार आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानऐवजी करण जोहर हा शो होस्ट करताना दिसला होता. पण या आठवड्यात भाईजानच्या चाहत्यांना तो शो होस्ट करताना पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
किंग खानने चाहत्यांना दिलं दिवाळीचा गिफ्ट; ‘पठाण’चा धमाकेदार टीझर आला समोर

सिद्धू मूसेवाला हत्याकांडात नवा ट्विस्ट; एनआयएने केली अफसानाची 5 तास चौकशी

हे देखील वाचा