Wednesday, October 30, 2024
Home बॉलीवूड रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ऍनिमल’ चित्रपटाचे पोस्टर समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीझ

रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ऍनिमल’ चित्रपटाचे पोस्टर समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीझ

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट Animal त्याच्या रिलीजबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अनेकवेळा निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवली आहे. अॅनिमलची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच १ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सँडी रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

रणबीर कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल सारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अशा परिस्थितीत या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी चित्रपटाचा प्री-टीझर रिलीज केला होता.

या प्री-टीझर व्हिडिओमध्ये रणबीर एका उग्र अवतारात दिसत होता. त्याचा डरावना लूक चाहत्यांना खूप आवडला. व्हिडिओमध्ये रणबीर त्याच्या शत्रूंना कुऱ्हाडीने एकामागून एक मारताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
स्वरा भास्करने केली बेबी शॉवर पार्टी एन्जॉय, सोशल मीडियावर केले कुटुंबाचे फोटो शेअर
प्रेग्नेंसीवर रुबिना दिलैकने दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला भीती वाटते की…’

हे देखील वाचा