Thursday, July 18, 2024

रणबीर कपूरचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, ‘आता लग्नानंतर तरी…’

बॉलिवूडमध्ये आघाडीच्या सुपरहिट जोडप्यांमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नावाचा समावेश होतो. हे सुप्रसिद्ध कलाकार जोडपे सध्या त्यांच्या पालकत्वाचा आनंद लुटत आहेत. अभिनेत्री आलियाने मागील वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये मुलगी राहा हिला जन्म दिला होता. लेकीच्या जन्मानंतर कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेकदा जेव्हाही हे जोडपं माध्यमांपुढे येतं, तेव्हा आपल्या लेकीविषयी नक्कीच बोलताना दिसतात. सध्या आलिया आणि रणबीर एका वेगळ्याच कारणमुळे चर्चेत आले आहेत.

बॉलिवूडची सावरिया रणबीर कपूर (Ranbir Kapoor Videos) आणि आलिया भट्ट अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर ट्रोलचे लक्ष्य बनतात. आता नुकतेच रणबीर कपूरने असे काही केले ज्यामुळे त्याला पुन्हा एकदा युजर्सने ट्रोल केले आहे. रणबीर आणि आलिया त्यांच्या व्यस्त वेळातून वेळ काढून सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवत आहेत. आलिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे आणि कुटुंबातील अनेक व्यक्तींचे फोटो सोशल मीडिआवर शेअर करत असते.

सध्या आलिया आणि रणबीरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलिया आणि रणबीर त्याची मुलगी राहा सोबत घेऊन सुट्टीचा आनंद घेत आहेत. रणबीर आणि आलियाचे मित्रांसोबत वेळ घालवतानाचे फोटो आणि व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत.

नुकतेच रणबीर-आलिया यूएस ओपन टेनिस चॅम्पियनशिप पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. जिथून रणबीर कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जेव्हा कॅमेरा हॉलिवूड अभिनेत्री मॅडलिन क्लाइनला कैद करतो, तेव्हा रणबीर कपूर अचानकमध्ये येतो आणि विजय चिन्हावर सही करतो. मग ते बाजूला होतात. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरची खोडकर शैली स्पष्टपणे दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

 एकीकडे काही यूजर्सना रणबीर कपूरचे हे वागणे थोडे बालिश वाटले, तर दुसरीकडे काही लोकांना रणबीर कपूरचा हा खोडकरपणा आवडला. या व्हिडिओवर कमेंट करताना एका ट्रोलने लिहिले की, “लग्नानंतरही तो सुधारला नाही, तो लहान मुलासारखा वागतो”. सध्या हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Ranbir Kapoor and Alia Bhatt video has gone viral on social media angering netizens)

अधिक वाचा-
मुहूर्त ठरला! अल्लू अर्जुनचा अंगावर काटा आणणारा ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
जाळ अन् धूर संगटच! पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘जवान’चे वादळ; आकडा एकदा वाचाच

हे देखील वाचा