धनश्रीच्या रंगात रंगला युजवेंद्र, प्रजासत्ताक दिनी केला ‘रंग दे बसंती’ गाण्यावर जबरदस्त डान्स


भारतीय क्रिकेट टीमचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने मागच्याच महिन्यात यूटुबर धनश्री वर्मासोबत लगीनगाठ बांधली. या दोघांची जोडी नेहमीच त्यांच्या फॅन्सचे व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजन करत असते. फॅन्स देखील त्यांच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत असतात.

नुकताच आपण आपल्या देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्यानिमित्ताने काल संपूर्ण सोशल मीडियावर देशभक्तीचा आणि देशप्रेमाचा रंग चढलेला दिसला. आम पासून खास पर्यंत सर्वच जणांनी एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्वांमध्ये धनश्री आणि युजवेंद्र यांच्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघानी २६ जानेवारीच्या या खास दिवशी रंग दे बसंती गाण्यावर डान्स करत देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. धनश्री निळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तर युजवेंद्र पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे.

धनश्रीचे डान्स कौशल्य तर सर्वानाच माहित आहे, मात्र या व्हिडिओच्या निमित्ताने युजवेंद्र देखील चांगला डान्स करतो हे सर्वाना समजले. युजवेंद्रने धनश्रीसाठी खास डान्स शिकवत हा व्हिडिओ तयार केला आहे. त्याच्या या प्रयत्नांना फॅन्सने देखील पसंतीची पोचपावती दिली आहे. या व्हिडिओमध्ये या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.