Wednesday, June 26, 2024

१५ वर्षांनी येतोय सुपरहिट ‘बंटी और बबली’ चित्रपटाचा रिमेक, राणी, सैफ करताय सिनेमाचे जोरदार प्रमोशन

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचा ‘बंटी और बबली’ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. आता या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हिडिओ समोर आला आहे. चित्रपटात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान सोबत सिद्धांत चतुर्वेदी सुद्धा झळकणार आहे.

राणी मुखर्जी आणि सैफ अली खान त्यांच्या आगामी चित्रपट ‘बंटी और बबली २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याआधी ‘हम तुम’ चित्रपटातील सैफ अली खान आणि राणी मुखर्जीची रोमँटिक जोडी प्रेक्षकांना खुप आवडली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘बंटी और बबली 2’ मधून पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात सुद्धा केली आहे. ज्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये राणी, सिद्धांत चतुर्वेदीसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सध्या व्हायरल होणार यांचा व्हिडिओ राणी मुखर्जी आणि सैफ अली खानच्या आगामी ‘बंटी और बबली 2’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये ‘बंटी और बबली 2’ चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. यावेळी राणी आणि सिद्धांत चतुर्वेदी मस्ती करत असतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ज्यामध्ये राणी सिद्धांतसोबत फोटो पोज देताना दिसत आहे. यामध्ये राणी खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. व्हिडिओत राणीने रंगीत प्लाजो आणि पांढरा टॉप परिधान केला असून, त्यात ती कमालीची मोहक आणि मादक दिसत आहे.

दरम्यान ‘बंटी और बबली’ चित्रपटाचा पहिला भाग २००५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात राणी मुखर्जीने बबलीची तर अभिषेक बच्चनने बंटीची भूमिका साकारली होती. शिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. आता १५ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपट १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या कलाकारांनी जोरदार प्रमोशनला सुरुवात केली आहे. यावेळी राणी मुखर्जीने आपल्या अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

हे देखील वाचा