‘८३’ चित्रपटाच्या निर्मात्यांना बसणार मोठा फटका, प्रदर्शित होताच लीक झाला चित्रपट


अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर रणवीर सिंगचा ‘८३‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. मागील दोन वर्षांपासून कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत होते. या चित्रपटाची कहाणी १९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित आहे. या साली भारताने वर्ल्ड कप आपल्या नावी केला होता. या चित्रपटात तगडे कलाकार आहेत. चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असताना चित्रपटांच्या निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो. ‘८३’ हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला आहे. 

चित्रपट विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की, हा चित्रपट सुपर ब्लॉकबस्टर होणार आहे आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारा आहे. अशातच रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (deepika padikone) यांचा ‘८३’ हा चित्रपट ऑनलाईन पायरेसीचा शिकार झाला आहे. जवळपास सगळे चित्रपट इंटरनेटवर लीक करणाऱ्या तमिळ रॉकर्सने हा चित्रपट देखील लीक केला आहे. (ranveer singh and deepika padukone film 83 leaked by online piracy)

तमिळ रॉकर्स व्यतिरिक्त फिल्मीझिला, एमपी ४ मूव्हीज, फिल्मी वॅप, मूव्ही फ्लिक्सवर लीक झाला आहे. या वेबसाईटवर एचडी स्वरूपात लीक झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार आतापर्यंत अनेक लोकांनी ‘८३’ हा चित्रपट फ्रीमध्ये डाउनलोड केला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या कमाईवर या गोष्टीचा नक्कीच परिणाम होणार आहे.

हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाल्याने या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कामे ५ कोटीपेक्षाही कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक चालले आहे. रणवीर सिंगसोबत चित्रपटातील बाकी कलाकारांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत जतीन सरना, ताहीर राज भसिन, एमी विर्क, हार्डी सिंधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठीसोबत बाकी अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा :

मुलीच्या लग्नात धमाकेदार डान्स करणाऱ्या दिलीप जोशी यांच्या डान्सचा एक अनसीन व्हिडिओ झाला व्हायरल

चाहत्यांच्या घोळक्यात अडकलेल्या आलियासाठी रणबीरने करून दिली वाट; तुम्हीही म्हणाल, ‘काळजी असावी तर अशी’

मीराने ख्रिसमस पार्टीची तयारी केली होती पूर्ण; पण तेव्हाच घडली मोठी चूक, ऐनवेळी… 

 

 

 


Latest Post

error: Content is protected !!