चाहत्यांच्या घोळक्यात अडकलेल्या आलियासाठी रणबीरने करून दिली वाट; तुम्हीही म्हणाल, ‘काळजी असावी तर अशी’


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून दोघेही गुरुवारी (२३ डिसेंबर) आपल्या मित्रांसोबत डिनर पार्टी करताना दिसले. या रात्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये आलिया (Alia Bhatt) आणि तिची बहीण शाहीन भट्ट रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. आलिया प्रथम तिच्या बहिणीला गाडीपर्यंत सोडते आणि मग तिच्या गाडीकडे जाऊ लागते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी आलियाला घेरले होते. हे पाहून रणबीर (Ranbir Kapoor) ताडतोब तिच्याजवळ आला आणि तिला गर्दी आणि पॅपराझींपासून वाचवत आपल्या कारपर्यंत घेऊन गेला. रणबीरचे आलियासाठी हे वागणे चाहत्यांना खूपच भावले आहे.

आलिया भट्ट दिसली वन-शोल्डर ड्रेसमध्ये
डिनर पार्टीसाठी आलियाने पिवळ्या रंगाचा वन-शोल्डर सीक्वेन्स ड्रेस परिधान केला होता. यासोबत तिने पांढरे शूज घातले आणि पोनीटेल घातली होती. आलियाने ब्लॅक अँड व्हाइट पर्सही कॅरी केली होती. रणबीरने ब्लॅक टी-शर्टला मॅचिंग जॅकेट आणि ब्लू जीन्स परिधान केली होती. त्याचवेळी शाहीन लांबलचक फ्लोरल ड्रेसमध्ये दिसली.

ब्रह्मास्त्र मोशन पोस्टर लॉन्च दरम्यान रणबीरने आपले प्रेम केले व्यक्त
अलीकडेच आलिया आणि रणबीर दिल्लीत ‘ब्रह्मास्त्र’ मोशन पोस्टर लाँच करताना एकत्र दिसले होते. कार्यक्रमादरम्यान आलिया स्टेजवर आली, तेव्हा रणबीर मागे गेला. यावर आलियाने रणबीरला विचारले की, तो का जात आहे. रणबीरने उत्तर दिले, “तू इतकी हॉट दिसत आहेस की, काहीतरी होत आहे यार मला.” यामुळे आलिया लाजली. दोघेही हात हातात घेतलेले दिसले. त्यानंतर रणबीरने आलियाला तिच्या भावना सांगण्यास सांगितले. “हे खूपच आहे, मी खूप भावनिक आहे ते जबरदस्त आहे, रोमांचक आहे,” असे ती म्हणाली होती. “इतके का? अजून तू तर पोस्टरमध्येही नाहीस,” असे रणबीरने विचारले.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. नुकतीच अशी बातमी आली होती की, हे जोडपे डिसेंबर महिन्यात लग्न करू शकते, पण कामाच्या बांधिलकीमुळे दोघांनी लग्न पुढे ढकलले. दोघेही पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लग्न करू शकतात. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आलियाचा ‘आरआरआर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय आलिया आणि रणबीर कपूर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!