Friday, July 5, 2024

रणवीर आणि दीपिका स्टायलिश अवतारात एकमेकांचा हात हातात घेत झाले मुंबई एयरपोर्टवर स्पॉट

बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांना ओळखले जाते. या दोघांची तुफान फॅन फॉलोविंग आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांना सतत एकत्र बघण्यासाठी फॅन्स सतत उत्सुक असतात. मीडियामध्ये देखील दीपिका आणि रणवीर गाजताना दिसतात. या दोघांची लोकप्रियता बघून मीडियादेखील सतत त्यांच्यावर कॅमेरे रोखून असते. त्यांच्या बारीक सारीक गोष्टी देखील मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात गाजताना दिसतात.

दीपिका आणि रणवीर यांना नुकतेच मुंबई एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. एयरपोर्टवर हे दोघेही एकमेकांचा हात पकडून बाहेर पडताना दिसले. त्यांना पाहून त्यांचे फॅन्स खूपच खुश झालेले दिसले. अतिशय स्टायलिश अवतारात असलेल्या दिपवीर यांची लगेचच मीडियाचे आणि फॅन्सचे लक्ष वेधून घेतले. रणवीरने ग्रे कलरचा टीशर्ट आणि ब्लू कलरची डेनिम तर दीपिकाने व्हाईट कलरचा टीशर्ट आणि ब्लू कलरची डेनिम घातली होती. या ड्रेसवर दीपिकाने व्हाईट रंगाचे शूज तर रणवीरने ब्राऊन रंगाचे शूज घातले होते. याशिवाय कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि सरकारी नियम पाहून दोघांनीही मास्क घातले होते. एकमेकांचा हात पकडून दोघेही एयरपोर्टमधून बाहेर पडले.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, दोघेही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’83’ सिनेमात एकत्र दिसले होते. १९८३ साली भारताने क्रिकेटमधला पहिला वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला होता. याच विजयावर आधारित हा सिनेमा होता. चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची तर दीपिकाने कपिल देव यांच्या पत्नीची रोमी भाटिया यांची भूमिका साकारली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेहीसोबत दिसले होते. दीपिका लवकरच तिच्या आगामी ‘गेहराइया’, ‘फाइटर’ आणि ‘पठान’ दिसणार असून, रणवीर सिंग ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा