Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सिद्धू दादा लव्ह यू’, सिद्धार्थ जाधवच्या ऍक्टिंगचा रणवीरही बनला फॅन; चाहत्यांना म्हणाला, ‘सिनेमा पाहाच’

सन 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या मराठी सिनेमातून अभिनेता सिद्धार्थ जाधव याने कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. यानंतर त्याने हिंदी आणि मराठी असे जवळपास 80 हून अधिक सिनेमात काम केले. अशात त्याचा आणखी एक मराठी सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडमधील कलाकार मंडळीही त्याच्यासोबत उभी आहेत. बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ अभिनेता रणवीर सिंगने सिद्धार्थचा सिनेमा पाहण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. विशेष म्हणजे, तो यावेळी मराठीत बोलत होता.

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याच्या आगामी मराठी सिनेमाचे नाव ‘बालभारती’ (Baalbharti) असे आहे. हा सिनेमा शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) चित्रपटगृहात प्रेक्षकांची वाट पाहत आहे. अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने एका व्हिडिओमार्फत चाहत्यांना हा सिनेमा पाहण्याचे आवाहन केले आहे.

अभिनेता रणवीर सिंगचा हा व्हिडिओ सिद्धार्थ जाधव याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. रणवीरचा हा व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये अभिनेत्याला टॅग करत लिहिले की, “धन्यवाद रणवीर भावा. तू कमाल आहेस. मनापासून आभार दादा. दादा के जलवे. लव्ह यू यार. 2 डिसेंबरला बालभारती रिलीज होतोय आणि 23 डिसेंबरला सर्कस. 2 डिसेंबरला ट्रेलर येतोय. डबल धमाका.”

रणवीरचा व्हिडिओ
या व्हिडिओत रणवीर म्हणत आहे की, “नमस्कार, मी रणवीर सिंग. आताच मी बालभारती या सिनेमाचा ट्रेलर पाहिला आहे. सिद्धू दादा आय लव्ह यू. काय ऍक्टर आहेस तू. भारी माणूस आहेस तू सिद्धू दादा. दादा के जलवे. 2 डिसेंबरपासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. नक्की बघा. लव्ह यू सिद्धू. थँक्यू मित्रांनो. मजा करा.”

हेही नक्की वाचा- जमतंय की राव! सिद्धूने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनला मराठी बोलायला पाडलं भाग, व्हिडिओ पाहाच

सिद्धार्थने शेअर केलेला रणवीरचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दोनशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यापूर्वीही सिद्धार्थच्या ‘बालभारती’ या सिनेमाचे प्रमोशन जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने केले होते. सिद्धार्थ तिला मराठी बोलायला शिकवतानाही दिसला होता.

आता सिद्धार्थ या सिनेमात काय धमाल करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Ranveer Singh appealed to fans to watch Siddharth Jadhav Movie Baalbharti)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फीफामध्ये लाईव्ह परफॉर्म करणाऱ्या नोरासोबत अश्लील कृत्य, घडला प्रकार व्हिडिओत कैद
शहनाझच्या हृदयात अजूनही जिवंत आहे सिद्धार्थ, आठवण काढत कॅमेऱ्यासमोरच रडली ढसाढसा

हे देखील वाचा