Tuesday, May 21, 2024

रणवीरने दीपिकासोबतचे लग्नाचे सगळे फोटो इंस्टावरुन केले डिलीट, नक्की कारण काय?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे बी-टाऊनच्या पॉवर कपल्सपैकी एक आहेत. अलीकडेच रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवरून दीपिका पदुकोणसोबतचे लग्नाचे सर्व फोटो हटवले आहेत. अशा परिस्थितीत आता चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि या जोडप्याच्या नात्यात काही दुरावा निर्माण झाला आहे की काय अशी भीती त्यांना वाटत आहे.

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून लग्नाचे फोटो काढून टाकले असले तरी दीपिका पदुकोणच्या अकाउंटवर हे फोटो उपलब्ध आहेत. रणवीर सिंगने दीपिका पदुकोणसोबतच्या लग्नाचे फोटोच डिलीट केले नाहीत तर 2023 च्या आधीच्या सर्व पोस्टही त्याच्या प्रोफाईलवरून काढून टाकल्या आहेत.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. दीपिका पदुकोणने फेब्रुवारीमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. सप्टेंबरमध्ये ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचे तिने सांगितले होते. रणवीर आणि दीपिका देखील सध्या त्यांचा बेबीमून एन्जॉय करत आहेत.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी ‘रामलीला’ चित्रपटादरम्यान सुरू झाली होती. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. रणवीर आणि दीपिकाने 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये कोकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केले. ‘रामलीला’ व्यतिरिक्त रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यामध्ये ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’चा समावेश आहे. आता ही जोडी रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रीती झिंटा विराटच्या मैदानावरील आक्रमकता आणि डान्स मूव्हची फॅन; म्हणाली, ‘मला तो खूप आवडतो;
‘क्रू’च्या यशाने करीना खूश; म्हणाली, ‘आता हिरोईनही मोडू शकतात बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड’

हे देखील वाचा