Wednesday, June 26, 2024

रणवीर सिंग आणि पत्नी दीपिकासोबत शेअर केलं व्हिडिओ, एकत्र बोट राईडचा घेतेय आनंद

बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) ओळखले जातात. या दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्यांनी मध्यंतरी जोर पकडला होता. पण, अफवांपासून दूर, हे जोडपे आजकाल एकत्र चांगला वेळ घालवत आहेत. नुकताच शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त पठाणचा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. तिची शाहरुखसोबतची केमिस्ट्री पुन्हा एकदा हिट झाली आहे. टीझरला चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती ज्यामध्ये दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसले.

रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा आणि दीपिकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे एकत्र बोट राईडचा आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी रणवीर आणि दीपिका दोघांनीही पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. अभिनेत्रीने तिचा लूक काळ्या शॉर्ट्ससह जोडला आणि पांढर्‍या स्नीकर्स आणि सनग्लासेससह तिचा लूक पूर्ण केला. रणवीरने दीपिकाचा छोटासा व्हिडीओ शेअर करत तिला ‘क्युटी’ म्हटलं. रणवीर-दीपिकाचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. रणवीर आणि दीपिकाला एकत्र पाहून दोघांमध्ये सगळं काही व्यवस्थित असल्याचं दिसत आहे.

Ranveer Singh, deepika padukone, ranveer deepika boat ride, deepika padukone instagram, deepika padukone net worth, deepika padukone sister, दीपिका पादुकोण, दीपिका पादुकोण रणवीर सिंह, bollywood news, entertainment news

रणवीर-दीपिकाचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. सोशल मीडियावर दोघांच्या फॅन पेजवरही हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. याआधी दीपिका-रणवीर यांच्याबद्दल अफवा पसरल्या होत्या की या जोडप्यामध्ये काही चांगले चालले नाही. कारण, दोघेही बी-टाऊन दिवाळी पार्टी आणि इतर पार्ट्यांपासून दूर होते. पण, रणवीरच्या व्हिडिओवरून हे स्पष्ट झाले आहे की, सध्या दोघेही एकत्र रोमँटिक वेळ घालवत आहेत.

बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. तथापि, अलीकडेच अफवा पसरल्या होत्या की त्यांच्यामध्ये काही चांगले नाही. तथापि, या जोडप्याने त्यांच्या प्रेमाने भरलेल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्व अफवा खोडून काढल्या आहेत. दुसरीकडे, दीपिकाने माजी अभिनेत्री आणि परोपकारी मेघन मार्कल, डचेस ऑफ ससेक्स यांच्यासोबत एका विशेष पॉडकास्टवर रणवीर सिंगबद्दल आणि कामामुळे दोघांना किती तास दूर राहावे लागते याबद्दल देखील बोलले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ…

रिषभ शेट्टी नव्हे तर कांतारामधील शिवा ही भूमिका साकारणार होता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, पण आता…

हे देखील वाचा