Monday, July 1, 2024

बादशाहने शेअर केलाय, तब्बल १७ वर्षांपूर्वीचा थ्रोबॅक फोटो; त्याला पाहून चाहत्यांमध्ये उडालाय एकच गोंधळ!

रॅपर बादशाह त्याच्या निराळ्या अंदाजासाठी ओळखला जातो. चाहते त्याच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. बादशाहची गाणी बघता बघताच व्हायरल होतात. तो सतत त्याच्या गाण्यांमुळे चर्चेचा विषय बनत असतो. आताही सोशल मीडियावर त्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र यामागचे कारण थोडे वेगळे आहे.

शेअर केला थ्रोबॅक फोटो
खरं तर, बादशाहने त्याच्या चाहत्यांसाठी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, जो पाहून त्याचे चाहते गोंधळात पडले आहेत. बादशाहने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १७ वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो एका तलावाच्या जवळ उभा असलेला दिसत आहे. हा जुना फोटो शेअर करत, बादशाहने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

असा होता बादशाहचा लूक
फोटोमध्ये बादशाहने करड्या रंगाचा ओव्हरसाईज टी-शर्ट परिधान केलेला दिसत आहे. तसेच, काळ्या रंगाचा चष्मा लावलेल्या या सेल्फीमध्ये तो खूप क्यूट दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बादशाहने लिहिले आहे, “साल २००४, टी शर्ट- थोडी शेडी. रोजगाराची स्थिती – आवारा आहे मी.”

https://www.instagram.com/p/CPdExBYArme/?utm_source=ig_web_copy_link

चाहते पडले गोंधळात
बर्‍याच चाहत्यांनी बादशाहला क्यूट म्हटले आहे. मात्र काही नेटकरी हा फोटो पाहून, गोंधळात पडले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, युजर्स गोंधळात पडण्यामागचे कारण काय आहे? तर नेटकरी म्हणत आहेत की, बादशाह २००४ साली जसा दिसत होता, तसाच तो २०२१ मध्येही दिसतो. जर तुम्ही बारकाईने पाहिले, तर तुम्हाला त्यात अधिक फरक जाणवणार नाही.

या चित्रपटातून केले होते पदार्पण
एक गोष्ट निश्चित आहे की, बादशाहची ड्रेसिंग स्टाईल आणि त्याची फॅशन सेन्स बर्‍याच प्रमाणात बदलली आहे. ‘सॅटर्डे सॅटर्डे’, ‘तारीफें’, ‘गरमी’, ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ यांसारखे हिट गाणे देणाऱ्या बादशाहने, २०१९ साली ‘खानदानी शफखाना’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात तो एका रॅपरचीच भूमिका साकारताना दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा