‘तुझी बकवास बंद कर’ आईला असे म्हणताच अभिनेत्री रश्मी देसाई झाली भलतीच ट्रोल, व्हिडिओ व्हायरल

Rashami Desai get troll for misbehave with her mother, throw back video viral


दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सर्वत्र मातृदिन साजरा केला जातो. याच निमित्ताने रविवारी (९ मे) अगदी सामान्य माणसांपासून ते बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या आईवर असलेले प्रेम व्यक्त करत आहेत. अनेकजण त्यांच्या आई सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आज मातृदिन साजरा होत आहे. अशातच‌ टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमुळे ट्रोल झाली होती.

रश्मीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मी तिच्या आईसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रश्मी व्हिडिओ बनवत आहे, हे बघून तिची आई तिथून जाऊ लागते. या नंतर रश्मी तिच्या आईला गुजरातीमध्ये काहीतरी बोलते. यांनतर ती तिच्या आईला म्हणते की, “चल बकवास बंद कर.”

तिच्या आईसोबत ती अशाप्रकारे बोलल्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. युजर म्हणत आहेत की, ती तिच्या आई सोबत खूप उद्धटपणे बोलत आहे. त्यामुळे नेटकरी तिला खूप ट्रोल करत होते. एका युजरने लिहिले होते की, “आईला तू नाही बोलत, आपल्या आई- वडिलांना नेहमी तुम्ही असे म्हणले पाहिजे.” दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “हे एका मुलीचे प्रेम आहे.”

मागील काही दिवसांपासून रश्मी सोशल मीडियावर धमाल करत आहेत. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिने एक व्हिडिओ शेअर केला होता, या व्हिडिओमध्ये ती स्कर्ट घालून डान्स करत होती. त्यामुळे तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

काहींनी तिला तिच्या ड्रेस वरून ट्रोल केले होते, तर काहींना रश्मीचा बोल्ड अंदाज खूपच आवडला होता. युजरने तिच्या स्टाईल आणि फॅशनचे खूप कौतुक केले होते. तसेच तिच्यात असणाऱ्या आत्मविश्वासाला देखील दाद दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मातृदिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केला चिमणीचा व्हिडिओ, सांगितले आईचे महत्त्व

-‘चित्रपटसृष्टीची वाघीण आली’, रश्मी देसाईचा रस्त्यावरील कॅटवॉक व्हिडिओ पाहून अभिनेत्याची भन्नाट कमेंट

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.