बापरे! केवळ एका सिनेमात काम केलेल्या रश्मिकाने घेतले ‘डेडली’ सिनेमासाठी तब्बल ‘एवढे’ कोटी रुपये


कोरोनाचा प्रभाव कमी होत असतांनाच नवनवीन चित्रपटांच्या घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे २०२० हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खूप थंड गेले. मात्र २०२१ च्या मुहूर्तावर अनेक नवीन चित्रपट येत आहेत. त्यातच नुकताच विकास बहलच्या ‘डेडली’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हा नवीन चेहरा चित्रपटात दिसणार आहे. रश्मिका जरी बॉलिवूडसाठी नवीन असली तरी तिने साऊथच्या अनेक चित्रपटात कामं केले आहे. साऊथच्या अभिनेत्री बॉलीवूडमध्ये दिसणे काही नवीन अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता या यादीत रश्मिका मंदानाचे नावं जोडले जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार एकता कपूरला तिच्या आगामी चित्रपटासाठी एक फ्रेश चेहरा हवा होता. विकास बहलने रश्मिका मंदनाला ही स्क्रिप्ट ऐकवली आणि ती तिला आवडली. बॉलिवूडमध्ये नवीन असूनही, रश्मिका एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतले असल्याचं बोललं जात आहे.

‘डेडली’ हा एक विनोदी चित्रपट असून, विकास बहल या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत नीना गुप्ता आणि इतरही अनेक कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असेल.

‘डेडली’ हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटची निर्मिती असणार आहे. ‘मिशन मजनू’च्या चित्रीकरणानंतर रश्मिका ‘डेडली’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. साधारणत: या सिनेमाचे चित्रिकरण एप्रिल २०२१पासून सुरु होईल.

रश्मिका लवकरच ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा​​सोबत ती या सिनेमात झळकणार आहे.

रश्मिकाने याआधी तेलगू, तामिळ, कन्नड अशा भाषांमध्ये काम केले आहे. साऊथ मधील खूप यशस्वी अभिनेत्री म्हणून रश्मिका ओळखली जाते. सोशल मीडियावर लाखो लोकं तिला फॉलो करतात. तिने किरिक पार्टी, गीता गोविंदां, भीष्म, चलो, पुष्प, चमक, देवदास आदी सुपरहिट सिनेमात काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.