Saturday, June 29, 2024

बिग बी आणि ‘नॅशनल क्रॅश’ रश्मिका दिसणार ‘या’ आगामी चित्रपटात, सुरू झाली चित्रपटाची शूटिंग

बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंट यांच्या ‘गुड बाय’ या चित्रपटाची शूटिंग आजपासून मुंबईमध्ये सुरू झाली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नॅशनल क्रॅश रश्मिका मंदाना हे दिसणार आहेत. रश्मिकाने आजपासून शूटिंग चालू केली आहे, तर बिग बी हे रविवारपासून शूटिंगला सुरुवात करणार आहेत. ‘गुड बाय’ या चित्रपटातून एकता कपूर आणि विकास बहल हे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर नवीन कहाणी घेऊन येणार आहेत. याआधी या दोघांनी ‘उडता पंजाब’ आणि ‘लुटेरा’ या चित्रपटातून आले होते.

‘गुड बाय’ या चित्रपटाबाबत बोलताना निर्मात्यांनी सांगितले की, “‘गुड बाय’ हा चित्रपट एका खास विषयावर बनवला आहे. ज्यामध्ये इमोशन आणि एन्टरटेन्मेंट दोन्हीही बरोबर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या कहाणीशी प्रत्येक परिवार जोडलेला दिसणार आहे.”

रिलायन्स एन्टरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ शिबाशीष सरकार म्हणतात की, “आम्हाला आमचा पुढचा प्रोजेक्ट ‘गुड बाय’ सगळ्यांसमोर आणताना खूप आनंद होत आहे. यामध्ये बालाजी टेलिफिल्म्स आणि चित्रपट निर्माता विकास बहल यांसारख्या दोन गोष्टी एकत्र आल्या आहेत. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच कहाणी देखील रंजक असणार आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना सारख्या कलाकारांसोबत काम करताना आनंद होत आहे.”

चित्रपटाचे नाव आणि कलाकार बघूनच प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा