नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळवणारी रश्मिका मंदाना सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. अनेक मोठमोठे सिनेमे दिग्गज कलाकारांसोबत ती करत असून, तिने केलेले प्रदर्शित झालेले सिनेमे तुफान हिट ठरत आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीसोबतच आता बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा डंका वाजवण्यास सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमात रश्मिकाने अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेने आणि सिनेमे तीळ अमाप ओळख मिळवून दिली. या सिनेमाच्या तुफान यशानंतर आता रश्मिकाचे नाव दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील हाईएस्ट पेड अभिनेत्रींनमध्ये सामील झाले आहे. एका माहितीनुसार रश्मिकाने पुष्पा सिनेमासाठी तब्ब्ल ३ कोटी रुपये घेतले होते.
मीडियामधील काही रिपोर्ट्सनुसार शाहिद कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जर्सी’ सिनेमा आधी रश्मिकाचा ऑफर झाला होता. मात्र तिने हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. जर्सी हा सिनेमा साऊथ सिनेमा जर्सीचा रिमेक आहे. असे पहिल्यांदा नाही झाले की रश्मिकाने हिंदी चित्रपट नाकारले आहे. याआधी देखील तिने अनेक मोठ्या चित्रपटांना आणि दिग्दर्शकांना नकार दिला होता. रश्मिकाने दिग्दर्शक शंकर यांचा ‘आरसी १५’ हा सिनेमा नाकारला होता. त्यानंतर या चित्रपटात आता कियारा अडवाणीला घेतले गेले.
काही माहितीनुसार रश्मिका मंदानाने संजय लीला भन्साळी यांच्या एका चित्रपटाला देखील नकार दिला होता. या सिनेमात आता रणदीप हुडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत मनालीमध्ये ‘ऍनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’मध्ये दिसणार असून, अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-