Tuesday, March 5, 2024

बापरे बाप! ‘सावरिया’तून डेब्यू करणाऱ्या सोनमने केले होते ‘एवढे’ किलो वजन कमी, धक्काच बसेल

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर या दोघांनीही संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया‘ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला 15 वर्षे उलटून गेली आहेत, त्यासोबतच त्याच्या अभिनयालाही 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 15 वर्षांत या दोघांनी अनेक उतकृष्ट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. दोघेही वैवाहिक जीवन जगत आहेत, सोनम नुकतीच एका मुलाची आई झाली आहे, तर रणबीरही एका मुलीचा बाप झाला आहे. चित्रपटाच्या रिलीजला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोनमने तिचे बरेचसे फोटो अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘सावरिया’ (Saawariya) हा चित्रपट 9 नोव्हेंबर 2007 ला प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र, गेल्या 15 वर्षांत रणबीर (Ranbir kapoor) याने बाॅलिवूडला एकापेक्षा जास्त दमदार चित्रपट दिले. या दाेघांचाही 15 वर्षांचा चित्रपट प्रवास खूपच रंजक हाेता. अभिनय कारकिर्दीला 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोनम (Sonam Kapoor) हिने तिच्या वेगवेगळ्या चित्रपटांतील छायाचित्रांचा कोलाज इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

Sonam Kapoor Ahuja
photo courtesy: instagram/sonamkapoor

 

‘सावरिया’सोबतच सोनम कपूरनेही फिल्म इंडस्ट्रीत 15 वर्षे पूर्ण केली आहेत. सोनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टाेरीवर तिच्या इतक्या वर्षात केलेल्या चित्रपटांची झलक दाखवली आहे. आज सोनम स्लिम ट्रिम दिसत असेल पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी साेनमशी संपर्क साधला तेव्हा तिचे वजन 86 किलो होते. भन्साळींसारख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाल्यानंतर सोनमने वेट मॅनेजमेंटवर मेहनत घेतली आणि तिचे वजन 30 किलोने कमी केले.

Sonam Kapoor Ahuja
photo courtesy: instagram/sonamkapoor

सोनम कपूर आणि रणबीर कपूरचा डेब्यू चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी नंतर दोन्ही कलाकार यशाची शिडी चढत गेले. सोनमने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले आणि रणबीरने आलिया भट्टसोबत लग्न केले. सध्या दोघेही पालक झाल्याचा आनंद घेत आहेत.(bollywood actor ranbir kapoor and actress sonam kapoor filmy career completed 15 years)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलियाची स्टाईल देश-विदेशातही हिट; मॉडेल्सने गंगूबाई लूकमध्ये केलं रॅम्पवॉक

सलमानसोबत ‘या’ भारतीय महिला बॉक्सरने रोमँटिक गाणं केलं रिक्रिएटच; म्हणाली,’स्वप्न पूर्ण…’

हे देखील वाचा