Tuesday, June 25, 2024

क्या बात है! लग्नाच्या वरातीत ‘तूने मारी एन्ट्री’ गाण्यावर रसिका अन् आदित्यने धरला ठेका, व्हिडिओ आला समोर

‘शनाया’ या चंचल, नटखट आणि बिनधास्त पात्राने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील तिच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. खलनायकाच्या भूमिकेत असूनही तिने सर्वांना तिच्या प्रेमात पाडले होते. प्रेक्षक तिचा द्वेष करत असले, तरी प्रेक्षकांना ती तेवढीच हवीहवीशी वाटत होती. या मालिकेत तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता, तरी देखील प्रेक्षकांनी तिला नव्याने स्वीकारले होते. शनाया जेवढी मस्तीखोर होती, तेवढीच रसिका देखील मस्तीखोर आहे. याची प्रचिती आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून येतच असते.

रसिकाने नुकतेच एक महिन्यापूर्वी लग्न केले आहे. तिने कोणालाही न सांगता तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत गोव्यामध्ये लग्न केले. तिने लग्नानंतर जवळपास १५ दिवसांनी या गोष्टीची माहिती सगळ्यांना दिली. त्यानंतर तिने हळूहळू त्यांच्या लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत. लग्नाच्या सगळ्या विधी त्यांनी त्यांनी पार केल्या आहेत. यातच लग्नातील एक गोष्ट म्हणजे लग्नाची वरात. अशातच तिने त्यांच्या लग्नाच्या वरातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Rasika sunil share Their marriage dance video on social media)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांच्या लग्नानंतर सगळे ताशाच्या गजरात डान्स करताना दिसत आहे. रसिका आणि आदित्य देखील खूप एन्जॉय करताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्हिडिओमध्ये साफ दिसत आहे. ‘तूने मारी एन्ट्री’ या गाण्यावर रसिका आणि तिच्या परिवारातील सगळे डान्स करताना दिसत आहेत.

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा