Friday, August 1, 2025
Home अन्य काय सांगता! सात समुद्र पार करून रवी दुबेने दिल्या पत्नी सरगुनला वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा

काय सांगता! सात समुद्र पार करून रवी दुबेने दिल्या पत्नी सरगुनला वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा

कलाकारांना आपल्या चित्रपटांच्या शुटिंगमुळे बरेच दिवस बाहेर गावी आणि घरापासून लांब रहावे लागते. यादरम्यान त्यांना आपल्या कुटुंबीयांची आणि जास्त करून आपल्या जीवनसाथीची फार आठवण येते. अशात काही कलाकार आपल्या पती अथवा पत्नीच्या विरहामुळे दुसरे अफेअर देखील करतात. परंतु काही कलाकार आपल्या प्रेमाशी खूप प्रामाणिक असतात. ते शरीराने दूर असले, तरी मनाने आपल्या प्रियकराबरोबरच असतात. त्यातीलच एक अभिनेता रवी दुबे. रवीने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोमवारी रवी दुबेची पत्नी सरगुन मेहताचा वाढदिवस होता. सरगुन तिच्या कामानिमित्त सध्या लंडनला असते. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज देण्यासाठी रवीने तब्बल ७१८७ किलोमीटर प्रवास केला. आपल्या पत्नीच्या आयुष्यातील खास दिवशी आपण तिच्यासोबत असावे, म्हणून रवी मुंबईहून लंडनला रवाना झाला. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्याने लिहिले की, “माहित नाही का, पण तुझ्याविषयी बोलताना तुझ्याविषयी लिहिताना अचानक डोळ्यातून पाणी येते. तू माझ्या आयुष्याचा केंद्र आहेस. हे फक्त मलाच माहित आहे, रोज तुझ्या कुशीत झोपून उठल्यानांतर मला कसं वाटत. असं वाटत की कोणत्यातरी तेजस्वी देवासारख्या शक्तीच्या बाजूला मी झोपलो आहे. तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करतो.” (Ravi Dubey emotional surprise sargun Mehta on her birthday)

रवीने लिहिलेल्या या भावनिक पोस्टमूळे त्याचे चाहते देखील भावुक झाले आहेत. सर्वांनी त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या दोघांमधील प्रेम असंच कायम राहावं अशी आशा अनेक चाहत्यांनी व्यक्त केली. तसेच त्याने आपल्या पोस्टमध्ये खाली असेही लिहिले की, “तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तुझ्यासाठी मी ७१८७ किलोमीटरच नाही, तर पूर्ण वर्षभर देखील प्रवास करू शकतो.” रवी आणि सरगुन दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्यातील नाते हे फार घट्ट आहे. आपण एकमेकांना समजू शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लग्नगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साल २०१५मध्ये त्यांनी विवाह केला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा