Monday, July 1, 2024

Bharat Jadhav birthday: ‘या’ बसमध्ये बसले होते मराठी कलाकर; भरत जाधव यांनी सांगितला अनुभव, म्हणाला..

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी चित्रपटात काम केले आहे. आजकाल तो जास्त चित्रपटात दिसत नाही. पण आजही त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर आहे. सोशल मीडियावर देखील तो अनेकवेळा पोस्ट शेअर करत असतो. अशातच त्याची एक पोस्ट समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता भरत जाधवने त्याच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. भरत जाधवने आपल्या विनोदी शैलिने प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान मिळवले. 

भरत जाधवने (Bharat Jadhav) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो (Bharat Jadhav Photos) शेअर केला आहे. फोटो तसा जुनाच आहे. या फोटोत एसटीमध्ये अनेक लोक दिसत आहेत. फोटोत पाहता काही लोक चिंतेत दिसत आहेत. काहीजण खिडकीच्या बाजूला बसून निसर्गाचा अनुभव घेत आहेत. तर काहीजण झोपलेले दिसत आहे.

हा फोटो शेअर करून त्याने एक खास कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “हा फोटो खूप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः 30 वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीट पाशी बसलेले आहेत. तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले. आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!” अशाप्रकारे त्याने या फोटोचा अनुभव शेअर केला आहे.

त्याने त्याच्या चाहत्यांचा शेअर केलेला हा अनुभव अनेक कलाकारांना खूप आवडला आहे. तसेच या पोस्टवर अनेक कलाकार सातत्याने कमेंट करत आहेत. तसेच त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

भरत जाधवने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘खबरदार’, ‘पछाडलेला’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘भुताचा हनिमून’, ‘नाना मामा’, ‘होऊन जाऊ दे’, ‘अगंबाई अरेच्चा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात काम केले आहे. (Read Bharat Jadhav birthday story from an old bus)

आधिक वाचा-
…आणि म्हणून सुपरस्टार भरत जाधवच्या करोडों रुपयांच्या महागड्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे टॅक्सीचा फोटो
पुणेकर स्मिता पाटीलच्या ‘या’ 3 इच्छा राहिल्या अपूर्ण, वाचा कोणत्या आहेत ‘त्या’ इच्छा

हे देखील वाचा