सिनेजगतातील ‘हे’ कलाकार खऱ्या आयुष्यात आहेत सख्खे भावंडं; पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास


मनोरंजनाच्या छोट्या आणि मोठ्या पडद्याचा नेहमीच एकमेकांशी जुना संबंध राहिला आहे. मनोरंजनाच्या या दोन्ही माध्यमांनी लोकांना स्वतःशी जोडून ठेवले आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत, ज्यांनी छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाच्या करकीर्दीला सुरूवात केली. या यादीमध्ये बरीच मोठ्या कलाकारांची नावे समाविष्ट आहेत. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतनेही पवित्र रिश्ता या मालिकेत मानवची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. आज आम्ही अशा काही कलाकारांबद्दल बोलणार आहोत जे वास्तविक जीवनात एकमेकांचे सख्खे भाऊ बहीण आहेत. यातील काहींनी आपल्या कामाने छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे, तर दुसऱ्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. खूप कमी लोक आहेत ज्यांना या भावा- बहिणीच्या जोडीविषयी माहिती असेल. कदाचित कोणीही या भावा- बहिणीच्या जोडीला पाहून फसेल. चला तर मग आज अशा भावंडांच्या जोडीवर एक नजर टाकूयात, ज्यांनी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावले आहे. मात्र, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या या नात्याबद्दल कल्पना देखील नाहीये.

मिहिका वर्मा- मिश्कत वर्मा
‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत मिहिकाच्या भूमिकेत दिसलेल्या या मिहिका या अभिनेत्रीचे वास्तविक जीवनातही तेच नाव आहे. त्याचबरोबर मिहिका वर्माचा छोटा भाऊ मिश्कत वर्मा हा देखील टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. मिश्कतला ‘निशा और उसके कजिनस’ या मालिकेमधून प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. याशिवाय मिश्कत ‘इच्छाधारी नागिन’ या मालिकेमध्येही दिसला आहे.

मेहेर विज- पीयूष सहदेव
बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मेहेर विज ही टीव्ही अभिनेता पीयूष सहदेव याची बहीण आहे. सलमान खानच्या सुपरहिट फिल्म ‘बजरंगी भाईजान’ मध्ये मेहेर विजने मुन्नीच्या आईची भूमिका साकारली होती. आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटामध्ये मेहेर ही झाईरा वसीमच्या आईच्या भूमिकेत दिसली आहे. तर पीयूष हा जेनिफर विंगेट हिच्या ‘बेहद’ सीरियलमध्ये दिसला होता.

अल्का कौशल – वरुण बडोला
अल्का कौशल यांना टीव्हीच्या जगात कुठल्याही ओळखीची गरज नाही. अल्का अनेक टीव्ही मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये दिसली आहे. अलकाने ‘स्वरागिनी-जोड़े रिश्तों का सुर’ आणि ‘कुबूल है’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अल्काने ‘क्वीन’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातही काम केले आहे. पण अनेकांना हे ठाऊक नसेल की, अल्का कौशल ही प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता वरुण बडोलाची मोठी बहीण आहे.

आलोक नाथ- विनिता मलिक
बॉलिवूड आणि डेलीसोप्स दुनियेतील संस्कारी बाबूजी अशी ओळख असलेले आलोक नाथ हे अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांचे महत्त्वाचे भाग राहिले आहेत. आलोक नाथ यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक विस्मरणीय पात्रे साकारली आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? की आलोक नाथ हे अभिनेत्री विनिता मलिक यांचे भाऊ आहेत. विनिता यांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा सिंघानियाच्या आजीची भूमिका साकारली होती. हे दोन्ही भावंडे टीव्ही आणि चित्रपटांच्या जगात त्यांच्या संस्कारी भूमिकेबद्दल ओळखले जातात.

रिद्धी डोगरा- अक्षय डोगरा
रिद्धि डोगरा हिने छोट्या पडद्यावर ‘मर्यादा…लेकिन कब तब’ या मालिकेद्वारे यश संपादन केले आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर श्यामक डावर यांच्या डान्स ग्रुपचा एक भाग होती, तर रिद्धिचा छोटा भाऊ अक्षय डोगरासुद्धा टीव्ही इंडस्ट्रीत काम करतो. अक्षय ’12/24 करोल बाग’ आणि ‘इस प्यार को क्या नाम दूं’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसला आहे.

तनुश्री दत्ता- इशिता दत्ता
या दोन सख्ख्या बहिणींच्या जोडीवरही नजर टाकूयात. बंगाली सौंदर्यवती तनुश्री दत्ता हिने 2004 मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्सचा मान मिळविला होता. त्यानंतर ती बॉलिवूडकडे वळली आणि काही चित्रपटांमध्ये दिसली. तनुश्रीची धाकटी बहीण इशिता दत्ता हिनेदेखील काही बॉलीवूड चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केले आहे. इशिता ही अभिनेता वत्सल सेठ याची पत्नी आहे.

गौहर खान- निगार खान
अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खानने टीव्ही आणि मॉडेलिंगच्या जगाबरोबरच बॉलिवूडमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गौहर बिग बॉस च्या 7 व्या पर्वाची विजेतीही ठरली आहे, तर तिची मोठी बहीण निगार खानने छोट्या पडद्यावर आपले नाव कमावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दारूचा वास लपवण्यासाठी धरम पाजी खाऊन यायचे कांदा; जाम वैतागलेल्या आशा पारेख यांनी केली होती थेट दिग्दर्शकाकडे तक्रार

-वेगळे राहूनही डिंपल यांनी घेतला नव्हता राजेश खन्नांपासून घटस्फोट; सनी देओलसोबत देखील जोडले होते त्यांचे नाव

-अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार


Leave A Reply

Your email address will not be published.