Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड वेड चित्रपटाचं ‘वेड’ परदेशातही, पाहा व्हायरल व्हिडिओ

वेड चित्रपटाचं ‘वेड’ परदेशातही, पाहा व्हायरल व्हिडिओ

लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यापासून बॉक्सऑफिसवर सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्री देखिल रितेश आणि जिनेलियाचे कौतुक करत आहेत. रितेश नवीन दिग्दर्शनाच्या उद्योगात उतरला असून त्याला पहिल्या चित्रपटातूनच यश लाभलं आहे. अशातच ‘मला वेड लावलंय‘ या गाण्यावर अनेक चाहत्यांनी रिल व्हिडिओ बनवून पोस्ट केले आहेत. सोशल मीडिया इनफ्लुएंसर किली पॉल याचा वेड गाण्यावरील रिल तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया इनफ्लुएंसर किली पॉल (Kili Paul) आणि त्याची बहिन हे दोघे परदेशता राहत असूनही ते सतत हिंदी गाण्यांवर व्हिडिओ बनवत असतात. अशातच सध्या सोशल मिडियावर ट्रेडिंग गाणं ‘मला वेड लावलंय’ (Mala Ved Lavlay) हे तुफान गाजतंय. किलीने देखिल या गाण्यावर व्हिडिओ बनवला असून भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा वेड गाण्यावरील रिल सोशोल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फेसबुकवरील आठवणीतील विलास राव देशमुख त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करतण्यात आला आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या फॅन पेजवरुन हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून व्हिडिओ कॅप्शन दिलं आहे की, “आता वेडचं वेड विदेशात पण….”

रितेशचा वेड चित्रपट (दि, 30 डिसेंबर 2022) रोजी प्रदर्शित झाला असून अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतराल आहे. त्याशिवाय चित्रपटामधील वेड लावलंय या गाण्याला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. वेड चित्रपट हा दक्षिणमधील ‘मजिली’ चित्रपटाचा मराठी रिमेक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे

हे देखील वाचा