Thursday, November 30, 2023

‘वेड’ चित्रपट पाहिल्यानंतर सचिन पिळगावकरांनी केले रितेशचे कौतुक; म्हणाले, ‘त्याला पहिल्यापासूनच…’

मराठी सिनेसृष्टीमधील आणि हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड‘ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. वेड चित्रपटाचं अभिनय आणि दिग्दर्शन स्वत: रितेश करतोय त्यामुळे चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रत्येक कलाकाराने रितेशचे कौतुक केले आहे. त्याशिवाय रितेश आणि जिनेलिया देशमुख यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र जोशी यांनी रितेशचे कौतुक करत पोस्ट शेअर केली होती. नुकतंच मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर यांनी देखिल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नुककतंच वेड (Ved) चित्रपटाचं प्रिमिअर पार पडलं असून मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या प्रिमिअरला हजेरी लावली होती. त्यापैकी अनेक कलाकारांनी रितेश देशमुख कौतुक केले आहे. जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh)  तब्बल 10 वर्षानी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत असून तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे.

वेड चित्रपटाचं प्रिमिअर पार पडल्यानंतर सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी वेड चित्रपट पाहिल्या नंतर माध्यमांशी संवाद साधत असताना चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “त्याला पहिल्यापासून काहीतरी चांगलं करण्याचं वेड आहे. ते वेड या पद्धतीने तुमच्यासमोर आलं आहे. त्याने पहिल्यांदा दिग्दर्शन केले आहे मात्र, चित्रपट बघून असे वाटत नाही.” असे सांगत त्यांनी रितेशचे भरभरुन कौतुक केले आहे.

वेड चित्रपटामधील गाणी प्रसिद्ध संगितकार अजय-अतुल यांनी गायले आहेत. तसंच या चित्रपटामध्ये रितेश आणि जिनेलिया शिवाय मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेता अशोक सराफ (Aashok Saraf) यांनी रितेशच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर यांनी देखिल महत्वाच्या भूमिका साकारल्या आहे. त्याशिवया ‘मला वेड लावलंय‘ या गाण्यामध्ये बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) याने देखिल पाहुणा कलाकाराची भुमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदनान सामीने कसे कमी केले होते 130 किलो वजन? 51 वर्षीय गायकाने स्वत:च केला खुलासा
‘आम्ही आवाहन करतो की, चाहत्यांनी…’, पंतला भेटल्यानंतर बॉलिवूड दिग्गजांची कळकळीची विनंती

हे देखील वाचा