Friday, March 29, 2024

गोविंदाच्या ‘हत्या’ सिनेमातील छोटा राजा आज आहे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये बालकलाकारांना देखील खूप महत्व आहे. पूर्वीच्या काळात देखील बालकालाकरांना खूप महत्व होते. पूर्वी बालकलाकारांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या जायच्या. जर आपण काही दशकं मागे जाऊन पाहिले तर १९८८ साली गोविंदाचा (Govinda) ‘हत्या’ (Hatya) नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या मर्डर मिस्त्री सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. गोविंदा आणि नीलम यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचे खूपच कौतुक करण्यात आले होते.

या सिनेमाची कथा एका लहान आणि मुका असणाऱ्या मुलावर आधारित होती. ज्याने एक खून होताना पाहिले असल्यामुळे खलनायकाला त्याला मारायचे असते आणि गोविंदा त्याला वाचवत असतो. या मुलाने देखील सिनेमानंतर तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली मात्र तुम्हाला माहित आहे का, या सिनेमात ही राजा नावाची भूमिका साकारणारा मुलगा मुळात एका मुलीने साकारला होता. आज या सिनेमाला ३४ वर्ष झाले असून, एवढ्या वर्षांमध्ये कदाचित ही गोष्ट जास्त कोणाला माहित नसावी. ही भूमिका साकारली होती सुजीता (sujitha) जेव्हा सिनेमाचे शूटिंग चालू होते तेव्हा सुजीता केवळ ५ वर्षांची होती. एवढ्या कमी वयात तिने खूप नाव कमावले.

आज सुजीता दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठे नाव बनली आहे. एवढेच नाही तर तिने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. १२ जुलै १९८३ ला केरळमध्ये सुजीताचा जन्म झाला. तिने तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमधील १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पांडियन स्टोर्स (Pandian Stores) मधील तिची धनम ही भूमिका तुफान गाजली.

याशिवाय ती हरिचंदनम मालिकेत ‘उन्नीमाया’ ही भूमिका साकारून केरळमध्ये लोकप्रिय झाली. सुजीता ४१ दिवसांची होती तेव्हाच ती ‘आभास’ सिनेमात दिसली होती. फिल्ममेकर धनुष (Dhanush) सोबत तिचे लग्न झाले असून, तिला धनविन नावाचा एक मुलगा देखील आहे. सुजीताने अनेक रियॅलिटी शोचे परीक्षण देखील केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा