प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माते आणि उद्योगपती अचानी रवी म्हणजेच रवींद्रनाथ नायर यांचे शनिवारी (8जूलै) निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी कोल्लम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या गावीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अचनी रवी यांच्या पश्चात आता प्रताप नायर, प्रकाश नायर आणि प्रीता नायर ही मुले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, अचानी रवी यांची पत्नी उषा राणी यांचे 2013 मध्ये निधन झाले. त्या एक प्रसिद्ध गायिका होत्या. अचानी रवी यांनी चित्रपट उद्योगात निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 1970 ते 1980 च्या दशकात जनरल पिक्चर्स नावाचे बॅनर स्थापन केले. त्यांनी मल्याळममध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट केले.
1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अचानी’ या चित्रपटावरून त्यांना अचानी हे टोपणनाव देण्यात आले. त्यांंचे खरे नाव रवींद्रनाथ नायर (Rabindranath Nair) आहे. चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी कोल्लम सार्वजनिक वाचनालय आणि सोपानम सभागृह बांधले. अचानी यांनी थंपू, कुम्मट्टी आणि एस्तप्पन सारखे अनेक हिट चित्रपट केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 14 चित्रपट केले आहेत.
चित्रपटांमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 2008 मध्ये केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्काराने सन्मानित केले. काजू उद्योगातील कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अचानी यांचा जन्म 3 जुलै1933 रोजी झाला. त्याच्या वडिलांनी नायरसाठी मणिपाल मेडिकल कॉलेजमध्ये जागा निश्चित केली होती. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर नायर यांना वडिलांचा व्यवसाय सांभाळावा लागला. (Renowned filmmaker Rabindranath Nair passed away)
अधिक वाचा-
– तेजस्वी प्रकाशची ‘नागिन 6’ मालिका होणार बंद, शेवटचा एपिसोड ‘या’ दिवशी होणार प्रसारित
–मुंबई सोडून कोल्हापुरात का स्थायिक झाला भरत जाधव? म्हणाला, “मला मुंबई…”










