मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी खूप मेहनत करून त्यांचे करियर उभे केले आहे. त्यामुळे मराठी कलाकारांना त्याच्या कष्टाची जाणीव आहे. काही मराठी कलाकार कामासाठी आपले गावसोडून शहरात गेले आहेत. या यादीत प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव याच्या ही नावाचा समावेश आहे.
भरत (Bharat Jadhav) याने अनेत हिट चित्रपट दिले आहेत. त्याने मराठी चित्रपटात दमदार कामगिरी करून प्रेक्षकांच्या मनात एक विषेश ओळख निर्माण केली आहे. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. भरत सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. भरतने काही दिवसांपूर्वी मुंबई सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्गल त्याने आाता खुलासा केला आहे.
कामानिमित्त मुंबईला आलेल्या भरतचे मुळ गाव कोल्हापूर आहे. त्याते आई- वडिल कोल्हापूरला राहतात. भरतचे कोल्हापूरला खूप मोठे घर आहे. कोल्हापूरला जाण्याबजद्दल बोलतामा भरत म्हणाला की, “मुंबईहे शहर फक्त बिझनेस हब झालंय आहे, असं मला तरी वाटतंय. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीपासून दुरू राहू वाटत आहे. म्हणून मी कोल्हापूरमध्ये आई-वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा माझ काम असेल तेव्हा मी मुंबईला येईल. मी अजूनही मुंबईतील फ्लॅट विकला नाही. त्यामुळे मी मुंबईला आल्यावर शूटिंग किंवा काम असेल तेव्हा मी इथे येतो आणि परत कोल्हापूरला जातो.”
भरत पुढे म्हणाला की,” सध्याच्या धकाधकीच्या जीवनात थोडं थांबणं, वेळ घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाने कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. गावाकडे ताजी हवा आणि शांत वातावरण असते.पण मला मुंबई खूप आवडते.”
भरत जाधव यांच्या विषयी बोलायच झाल तर, त्याने ‘जत्रा’, ‘खबरदार’, ‘पछाडलेला’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘भुताचा हनिमून’, ‘नाना मामा’, ‘होऊन जाऊ दे’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात दमदार काम केले आहे. (The reason why actor Bharat Jadhav left Mumbai and settled in Kolhapur)
अधिक वाचा-
–चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी गुरुदत्त होते टेलिफोन ऑपरेटर, वाचा त्यांच्याबाबत कधीही न ऐकलेल्या गोष्टी
–तेजस्वी प्रकाशची ‘नागिन 6’ मालिका होणार बंद, शेवटचा एपिसोड ‘या’ दिवशी होणार प्रसारित