Monday, July 8, 2024

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन, जगभरातील चाहते शोकसागरात

हॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन‘ या मालिकेने जगभरातील वेड लावले असून यामधील प्रसिद्ध दिग्गज कलाकार विल्को जॉन्सन यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते अनेक दिवसांपासून एका गंभीर आजाराशी झुंद देत होते, आणि शेवटी त्यांच्या शराराने साथ सोडली आणि त्यांनी जगाला राम राम ठोकला.

अभिनेता विल्को जॉन्सन (Wilko Johnson) ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) या मालिकेतून अमाप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांचा सोशल मीडियालवर मोठा चाहतावर्ग त्यांना फॉलो कतरत होता. अभिनेता असूनते एक प्रसिद्ध  ब्रिटिश ब्लूज-रॉक गिटार वादकही होते, डॉ फीगलुड म्युझीशिअन म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांना कॅन्सरसारख्या घातक आजाराची लागन झाली होती. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे .हॉलीवूडमधील चाहते आणि सेलिब्रेटी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.(Game of Thrones actor Wilko Johnson passed away)

त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती जगासमोर सांगितले की, संगितकार अणि अभिनेता विल्को जॉन्सन यांनी आपल्या राहत्याघरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “ही अशी घोषणा आहे, जी आम्हाला कधीच करायची नव्हती आणि आम्ही विल्कोच्या कुटुंबाच्या आणि बॅंडच्या वतीने खूप जड अंतःकरणाने करतो विल्को जॉन्सन यांचे निधन झाले आहे.”असे सांगितले असून पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता विल्को जॉन्सन यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांचे फोटो शेअर त्यांना आदरांजली वाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वावर शोककळा
दिग्दर्शकाच्या ‘त्या’ एका निर्णयाने मोडली होती राजेश खन्ना आणि अमोल पालेकरांची जुनी मैत्री, वाचा सविस्तर

हे देखील वाचा