बॉलिवूडमध्ये अशी अनेक प्रसिद्ध स्टार कपल्स आहेत, ज्यांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. बॉलिवूडमधील याच जोडप्यांपैकी एक अभिनेता अली फजल(Ali Fazal) आणि अभिनेत्री रिचा चड्ढा(Richa Chadha) त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. रिचा चड्ढा आणि अली फजल लग्नबंधात अडकणार आहे. दरम्यान या दोघांच्या प्री वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीच्या हातावर अलीच्या नावाची मेहंदीसुद्धा लागली आहे. रिचाने आपल्या मेहंदी डिझाईनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मेहंदीचे डिझाईन फारच खास आहे.
अभिनेत्री रिचा आणि अली फजलच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाची तारीख आधीच ठरलेली होती. त्यानुसार प्रत्येक कार्यक्रम पार पडत आहे. अलीकडेच या दोघांचा मेहंदी सोहळा पार पडल्याचे दिसून येत आहे. रिचाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या मेहंदीचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीच्या हातभर मेहंदी काढण्यात आली आहे. रिचा व्हिडीओमध्ये मेहंदीची डिझाईन फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या मेहंदीची डिझाईन फार युनिक आहे.

रिचाने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. तिच्या हातावर काढण्यात आलेलय मेहंदीत अली फजलच्या नावाचे पहिले अक्षर A आणि तिच्या नावाचे पहिले अक्षर R दाखवताना दिसत आहे. त्याचसोबत मांजरीचा चेहरा बनवण्यात आला आहे. कारण अभिनेत्रींकडे दोन मांजर आहेत एकिचे नाव जुगनी आणि दुसरीचे नाव कमली असे आहे. या दोन्ही मांजरींवर रिचाचे प्रचंड प्रेम आहे. घरात ती सतत त्यांच्यासोबत धम्माल मस्ती करत असते. बऱ्याचवेळा अभिनेत्रीने सोशल मीडियावर त्यांचे फोटोदेखील शेअर केले आहेत.
येत्या दोन दिवसांत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. रिचा आणि अलीचे लग्न खूप आधी झाले असते. पण महामारीमुळे त्यांनी बऱ्याचवेळा आपले लग्न ढकले होते. सध्या दोघंही आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात थाटामाटात करत आहेत. हे लोक आपल्या लग्नाचे प्रत्येक विधी आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांपरिवारासोबत पार पाडणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य सुंदरीचा जलवा! बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’नेही धरला गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! 30 वर्षीय मॉडेलने फाशी घेत केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मागितली माफी










