Wednesday, March 22, 2023

धक्कादायक! 30 वर्षीय मॉडेलने फाशी घेत केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मागितली माफी

स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणारी मुंबई अनेकांचे स्वप्न पूर्ण करते, तर काहींचे तोडतेसुद्धा. ग्लॅमरसने भरलेल्या या इंडस्ट्रीतील हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक वेदना लपलेल्या असतात. अशातच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका मॉडेलने आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला आहे. आत्महत्येपूर्वी मॉडेलने सुसाईड नोटमध्ये आपल्या वेदना मांडल्या आहेत.

मॉडेलने केली आत्महत्या
मुंबईच्या अंधेरीत 30 वर्षीय मॉडेलने चार बंगला भागामधील एका हॉटेलमध्ये पंख्याला लटकून जीव (30 Years Old Model Suicide) दिला आहे. हॉटेलमध्ये एक खोली भाड्याने घेऊन मॉडेल राहायला आली होती. व्हर्सोवा पोलिसांनी ADRच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्या करणाऱ्या मॉडेलचे नाव आकांक्षा मोहन (Akanksha Mohan) असल्याचे सांगितले जात आहे. आकांक्षा लोखंडवालाच्या यमुना नगर सोसायटीत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेलने बुधवारी (दि. 28 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता जवळपास हॉटेलमध्ये चेक इन केले होते. तसेच, तिने रात्री जेवणाची ऑर्डरही दिली होती.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी ही धक्कादायक बातमी समोर आली. हॉटेलच्या वेटर रूमची घंटी वाजवली जात होती. त्याने अनेकदा आवाज दिला, पण खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर वेटरने याची माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने पोलिसांना फोन करून माहिती दिली. यानंतर पोलिसांनी लगेच हॉटेलमध्ये पोहोचत खोलीचा दरवाजा मास्टर चावीने उघडला. त्यानंतर जे काही पाहिले, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मॉडेलने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha Mohan (@im_akankshamohan)

हेही वाचा- मातृभूमीचा वाद! प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, ‘तुला भारतरत्न द्यायला पाहिजे…’

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?
हॉटेलच्या रूममधून पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली. सुसाईड नोटमध्ये मॉडेलने लिहिले होते की, “माफ करा. यासाठी कोणीही जबाबदार नाहीये. कुणालाही त्रास देऊ नका. मी खुश नाहीये. मला फक्त शांती पाहिजे.” व्हर्सोवा पोलिसांनी ADRअंतर्गत गुन्हा दाखल करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मॉडेलच्या आत्महत्येमागील खरे कारण ती खुश नसल्याचे आहे की वेगळंच काहीतरी प्रकरण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘तो बकबास शो…’, ‘कॉफी विथ करण’वर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘माझी सेक्स लाईफ…’

मराठी चित्रपटाचा अटकेपार झेंडा! ‘फोर्ब्स’ने घेतली ‘पल्याड’ चित्रपटाची दखल

हे देखील वाचा