Tuesday, June 18, 2024

हॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन रिचर्ड बेल्जर यांचे दुःखद निधन

अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅन्डअप कॉमेडियन आणि अभिनेते असलेले रिचर्ड बेल्जर यांचे १९ फेबुवारी २०२३ रोजी फ्रांस येथे दुःखद निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्यांनी त्यांचे करियर सुरु केले होते. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडमध्ये दुःखाचे वातावरण असून एक उत्कृष्ट विनोदवीर गेल्याची भावना कलाकारांमधून व्यक्त केली जात आहे.

रिचर्ड बेल्जर यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ रोजी ब्रिजपोर्ट, कनेक्टिकट येथे झाला. रिचर्ड बेल्जर यांना त्यांच्या जॉन मंच या भूमिकेसाठी ओळखले जाते. त्यांनी ही भूमिका ‘होमिसाइड: लाइफ ऑन द स्ट्रीट’ आणि ‘लॉ एंड ऑर्डर: एसवीयू’ यात साकारली होती. ‘लॉ एंड ऑर्डर: एसवीयू’ यांचे निर्माता असलेल्या डिक वुल्फ यांनी त्यांच्या निधनानंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “रिचर्ड बेल्जर यांच्या जासूस जॉन मंच तव इंडस्ट्रीमधील गाजलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या पात्रांपैकी एक आहे. रिचर्ड आपल्या आयुष्यात आनंद आणि हास्य घेऊन आले होते. ते उत्तम कलाकारासोबतच एक उत्तम व्यक्ती देखील होते. मला त्यांची खूप आठवण येईल.”

एनबीसी आणि युनिव्हर्सल टेलिव्हिजनने देखील रिचर्ड बेल्जर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. होमिसाइड: लाइफ ऑन द स्ट्रीट चे निर्माता असलेल्या बैरी लेविंसन, टॉम फोंटाना आणि डेविड साइमन यांनी एकत्र येत जॉन मंच या भूमिकेला आणले.

एनबीसी आणि युनिव्हर्सल टेलिव्हिजनच्या निर्मात्यांनी रिचर्ड बेल्जर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना सांगितले की, “प्रत्येकालाच रिचर्ड बेल्जर यांना होमिसाइड आणि लॉ एंड ऑर्डर: एसवीयू मध्ये डेट जॉन मंच या भूमिकेत बघताना आनंद मिळाला. पुढच्या अनेक दशकांपर्यंत लोकं ती भूमिका विसरू शकणार नाही. त्यानी ती भूमिका साकारण्यासाठी अजोड मेहनत घेतली होती. त्यांच्यात असणारा प्रोफेशनलपणा, प्रतिभा कामाबद्दल असलेले समर्पण आदी अनेक गुणांमुळे त्यांनी स्वतःला मनोरंजनविश्वात स्थावर केले. ” तत्पूर्वी सोशल मेडियावरूनही अनेक लोकं आणि फॅन्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा