Wednesday, March 22, 2023

अरे बापरे! बॉलिवूडमधील ‘या’ पाच अभिनेत्रींचे पती आहेत गर्भश्रीमंत, भल्याभल्या श्रीमंतांना देखील टाकले मागे

हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटक्षेत्राशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींशी विवाह करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रींचे पती मात्र या जगापासून खुप लांब आहेत. मात्र तरीही त्यांच्या कामाच्या क्षेत्रात ते यशाच्या शिखरावर असल्यामुळे या अभिनेत्रींसह त्यांच्या श्रीमंत पतींचीही नेहमी चर्चा होत असते. म्हणुनच या अभिनेत्री लग्नानंतर चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय नसल्या तरी चैनीचे आलिशान आयुष्य जगत असल्याचे आपल्याला दिसून येते. आज जाणून घेऊ सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी इतर क्षेत्रात काम करणाऱ्या गर्भश्रीमंत व्यक्तीशी विवाह करत थाटला संसार.

शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी ही सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. २००९ मध्ये तिने उद्योजक राज कुंद्रासोबत विवाह केला. राजने तिला दिलेल्या महागड्या गिफ्टची त्याकाळात खूपच चर्चा रंगली होती. समोर आलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती १३४ कोटी इतकी आहे तर राज कुंद्राची संपत्ती ५५० मिलीयन डॉलर इतकी आहे.

अनुष्का शर्मा – विराट कोहली
या यादीमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचाही प्रामुख्याने समावेश होतो. अनुष्का शर्मा आघाडीची अभिनेत्री आहे तर विराट कोहली हा क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. दोघांनी २०१७ मध्ये विवाह केला होता. रिपोर्ट्स नुसार अनुष्का शर्माची संपत्ती 34 मिलियन डॉलर इतकी असून, विराट कोहली जवळजवळ ७२० कोटीचा मालक आहे.

सोनम कपूर- आनंद आहूजा
अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनमने २०१८ मध्ये उद्योजक आनंद आहूजासोबत विवाह केला होता. आनंद आहुजा हे नॉनवेज आणि भाने सारख्या मोठ्या कंपन्याचे संस्थापक असून, त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल ४७३३ कोटी इतकी आहे.

असीन – राहुल शर्मा
असीन ही दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा सलमान खानसोबतचा ‘रेडी’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला होता. ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खूपच प्रसिद्ध आहे. तिने २०१८ मध्ये उद्योजक राहुल शर्मा सोबत विवाह केला होता. राहुल शर्मा हा मायक्रोमॅक्स कंपनीचा सह संस्थापक असून त्यांच्याकडे १४६० कोटी इतकी संपत्ती आहे.

ईशा देओल – भरत तख्तानी
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत विवाह केला होता. ते हिऱ्यांचे मोठे व्यापारी असून त्यांची एकूण संपत्ती १३६ कोटी इतकी आहे.

जुही चावला- जय मेहता
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुही चावलाचे नाव प्रामुख्याने घेतल जाते. तिने १९९५ मध्ये मेहता ग्रुपचे मालक जय मेहता यांच्याशी विवाह केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार जय आणि जुहीची एकूण संपत्ती २५४ कोटी इतकी आहे. जय मेहता हे परदेशातही त्यांचे अनेक उद्योग सांभाळतात.

हेही वाचा :

हे देखील वाचा