रिंकूचं लाजनं पाहून चाहत्यांना लागलं याड! तिचा लाजराबुजरा चेहरा पाहून उमटतायेत जोरादार प्रतिक्रिया


‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू ही सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या पोस्ट्स दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचा चाहतावर्ग भलामोठा आहे. हे चाहते तिच्या प्रत्येक फोटोला आणि प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देतात. हेच कारण आहे की, रिंकूने पोस्ट शेअर करता क्षणीच ती व्हायरल होऊ लागते. असाच एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. (rinku rajguru shared her video on chura liya hai song)

रिंकू इंस्टाग्राम अधिक सक्रिय असल्याचे दिसून येते. याच प्लॅटफॉर्मवर तिने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रिंकू ‘चुरा लिया है’ या हिंदी गाण्यावर आपल्या अदा दाखवत आहे. तिचे स्मितहास्य पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. व्हिडिओ पाहून असं वाटतं की, रिंकू कोणाला तरी पाहून लाजत आहे. व्हिडिओमध्ये तिचा लाजराबुजरा चेहरा अगदी गोड दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत रिंकूने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “डोळ्यांकडे नेहमी काहीतरी बोलायला असतंच.” नेहमीप्रमाणे या व्हिडिओलाही नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. ५ तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल ७७ हजारहून अधिक युजर्सने पाहिलं आहे, तर ३० हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या ‘छूमंतर’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. हा चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.