Saturday, January 17, 2026
Home मराठी मस्तच!! रिंकू राजगुरूने शेअर केला लेटेस्ट फोटो; एकत्र पाहायला मिळाले ‘सैराट’चे ‘आर्ची’ अन् ‘परशा’

मस्तच!! रिंकू राजगुरूने शेअर केला लेटेस्ट फोटो; एकत्र पाहायला मिळाले ‘सैराट’चे ‘आर्ची’ अन् ‘परशा’

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना प्रेम करायला काही नवीन चेहरे दिले. त्यातलेच दोन चेहरे आहेत, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू. चित्रपट तर तूफान गाजलाच, मात्र यातील कलाकारांना देखील एका रात्रीत प्रचंड लोकप्रियता मिळाली. या एका चित्रपटाच्या जोरावर आकाश आणि रिंकू स्टार कलाकार बनले. बघता बघताच त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी शिगेला पोहचली.

चित्रपट रिलीझ होऊन बरीच वर्षे लोटली आहेत, मात्र तरीही आकाश आणि रिंकू यांचे ‘परशा आणि आर्ची’ हे पात्रं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विशेष म्हणजे, त्यांना आजही याच नावाने ओळखले जाते. चित्रपटातील त्यांच्या प्रेमकथेने चाहत्यांना अक्षरशः भारावून सोडलं होतं. प्रेक्षक या दोघांच्या लव्हस्टोरीचे दिवाने झाले होते, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरणार नाही.

आता बऱ्याच दिवसांनी हे दोघे सोबत दिसले आहेत. या दोघांचा एकत्र फोटो समोर आला आहे, जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. रिंकू राजगुरूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो पोस्ट केला होता. यामध्ये रिंकू मिरर सेल्फी घेत आहे, तर आकाश तिच्या मागे उभा असलेला दिसला. या दोघांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (rinku rajguru shared photo with akash thosar see offscreen chemistry of them)

विशेष म्हणजे दोघे लवकरच ‘झुंड’ या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाला अजय-अतुल या प्रसिद्ध जोडीने संगीत दिलं आहे. ‘सैराट’नंतर आता प्रथमच आकाश आणि रिंकू एकत्र दिसणार आहेत. पुन्हा एकदा त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास

हे देखील वाचा