Tuesday, September 26, 2023

स्वत:च्याच लग्नात ऋषी कपूर-नीतू सिंग यांना आलेली चक्कर

बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत येणाऱ्या जोड्यांबद्दल बोलायचं झालं, तर ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू सिंग (Neetu Singh) यांच नाव येतंच. एव्हरग्रीन कपल्सपैकी एक असणारी ही जोडी बरीच गाजली. तसं तर ऋषी कपूर यांनी आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच चॉकलेट बॉयची इमेज तयार केली होती. त्यांच्या काळातील अनेक तरुणी ऋषी कपूर यांच्यासाठी वेड्या होत्या, पण ऋषी कपूर यांनी दिल मात्र धडधडलं ते नीतू कपूर यांच्याचसाठी. त्याच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक किस्से फेमस झाले, पण त्यांच्या लग्नाबद्दल एक खास किस्सा अनेकांना माहित नाही. ऋषी कपूर आणि नीतू सिंग हे दोघांचीही त्यांच्या लग्नात शुद्ध हरपली होती. पण का आणि कशामुळे हे ऐकायचं असेल, तर व्हिडिओ पूर्ण पाहा.

अभियन क्षेत्रात 70-80 च्या दशकांत ऋषी आणि नीतू हे दोघेही सक्रिय होते. त्यामुळे हळूहळू त्यांच्यात प्रेम फुललं आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता ऋषी म्हणजे द कपूर खानदानातील मुलगा म्हणजे त्यांचं लग्न ग्रँड होणार हे सहाजीकच होतं. तर त्यांनी 22 जानेवारी 1980 रोजी लग्नगाठ अखेर बांधली आणि ती शेवटपर्यंत त्यांनी हे नातं निभावलंही.

अपेक्षेप्रमाणे ऋषी आणि नीतू यांचं ग्रँड पद्धतीचं लग्न झालं. रेडीफला दिलेल्या एका मुलाखतीत नीतू यांनी त्यांच्या लग्नाबद्दल काही खुलासे केले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच लग्न मुंबईतील चेंबूर येथे असलेल्या एका गोल्फ कोर्सवर झालेलं आणि अगदी झाडून सर्व फिल्म इंडस्ट्रीला आमंत्रणं करण्यात आली होती. जवळपास 20 दिवस त्यांचं हे लगिनसराई सुरू होती बरं का. आता एवढे पाहूणे म्हणल्यावर नवरी एकदम भारी दिसायला पाहिजे की नाही. अगदी तसंच नीतू यांनी एकदम जड असा लेहंगा परिधान केलेला. पण या लेहंग्याने नीतू यांना चक्कर आलेली. इकडे नीतूच नाही, तर दुसरीकडे ऋषी यांनाही लग्नात चक्कर आलेली. त्याचं झालं असं की एवढी गर्दी ते सांभाळू शकले नाहीत आणि घोड्यावर चढण्याआधीच त्यांना चक्कर आली.

इतंकच नाही, तर ऋषी आणि नीतू यांच्या लग्नात फक्त फिल्म इंडस्ट्रीमधीलच लोक आले होते असं नाही बरं. तर चक्क बिन बुलाये मेहमानही आले होते, तेही अगदी सुटाबुटात आणि गिफ्ट्स घेऊन. आता त्याकाळच्या एकदम हिट जोडीचं लग्न होतंय म्हटल्यावर सर्वांनाच त्याबद्दल उत्सुकता होतीच म्हणा, पण खरी मजा तर पुढे आहे. या आमंत्रणाशिवाय आलेल्या पाहुण्यांनी गिफ्टच्या बॉक्समध्ये चक्क दगडं ठेवली होती. आता बसला ना धक्का. तर असे आहेत काही अनसुने किस्से. बरं आणखी एक ऋषी आणि नीतू यांच्य लग्नात नुसरत फतेह अली खान हे गायले होते.

1980पासून लग्नबंधनात बांधलेल्या या जोडीने 40 वर्षे सुखानं संसार करत प्रेमावर आणि लग्नावर विश्वास ठेवण्याचे उदाहरण समोर ठेवले होते. पण आज या जोडीतील ऋषी कपूर मात्र आता आपल्यात नाही. 2020मध्ये कर्करोगाशी लढाई करताना त्यांचे निधन झाले.(rishi kapoor and nitu singh fainted in wedding)

अधिक वाचा-
चित्तथरारक ’72 हूरें’ चित्रपट झाला प्रदर्शित; वाचा लोकांचे जबरदस्त रिव्ह्यू

केवळ 13 वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास

हे देखील वाचा