Saturday, July 6, 2024

एकनाथ शिंदेंनी मुखमंत्री पदाची शपथ घेतल्यावर रितेश देशमुखची पोस्ट आली चर्चेत

गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. कालच एकनाथ शिंदे यांनी मुख्यंमत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अनेकांना यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बॉलिवूड मधील अनेकांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) याने देखील ट्विट करून त्याचे मत मांडले आहे.

रितेश ट्विट करून नवीन मुख्यत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्याने उद्धव ठाकरे यांना धन्यवाद म्हटले आहे. त्याने लिहिले आहे की, “महाराष्ट्राचे पुरोगामी, कृतीशील आणि काळजी घेणारे मुख्यमंत्री श्री #उद्धव ठाकरे जी यांचे खूप खूप आभार. मानवतेने आजवरच्या सर्वात कठीण आणि अंधकारमय काळात – कोविड साथीच्या आजाराचा सामना केला आहे त्या वेळी आम्हा नागरिकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.”

तसेच त्याने पुढे लिहिले आहे की, “श्री. एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल- सरांना हार्दिक शुभेच्छा.”

त्याने पुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे देखील अभिनंदन करणारी पोस्ट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज आपण शपथ घेतली. आपले खूप खूप अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा.” अशाप्रकारे त्याने अभिनंदन केले आहे.

रितेश देशमुख समाजातील अनेक घटनांवर त्याचे मत व्यक्त करत असतो. राजकारणातील घराणे असलयाने राजकारणावर त्याचे सवच लक्ष असते. त्याने केलेल्या या पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा