Monday, May 13, 2024

कधीकाळी अंडरवर्ल्ड डॉनची प्रेयसी असलेली अभिनेत्री पडली ‘ या’ लोकप्रिय क्रिकेटरच्या प्रेमात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हिंदी सिनेजगत असो किंवा मराठी सिनेसृष्टी असो या क्षेत्रातील अभिनेत्री आपल्या अभिनया इतकाच त्या त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येक अभिनेत्रीच्या चाहत्यांना त्यांच्या चित्रपटांइतकीच वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची चांगलीच उत्सुकता लागलेली असते. या अभिनेत्रींमध्ये मोनिका बेदीचे नावही प्रामुख्याने घेतले जाते.मोनिका बेदी (Monica Bedi) ही तिच्या अभिनयाइतकीच प्रेमप्रकरणांमुळे चांगलीच चर्चेत आली होती. जाणून घेऊया तिच्या प्रेम प्रकरणाबद्दलचे हे रंजक किस्से. 

मोनिका बेदी ही हिंदी टेलिव्हिजन जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यासोबतच मोनिका बेदी तिच्या प्रेमप्रकरणांमुळेही चांगलीच चर्चेत आली होती. या प्रेमप्रकरणांमुळेच तिला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला होता. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी अभिनेत्री मोनिका बेदी तिच्या प्रेमप्रकरणामुळे पुन्हा एकदा तिच्या अफेअरमुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

आपल्या अभिनयाच्या करिअरच्या सुरूवातीलाच मोनिका अंडरवल्ड डॉन अबू सालेम सोबतच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली होती. याच प्रेमामुळे थेट तुरुंगातही जावे लागले होते. आता मोनिक पुन्हा एकदा तिच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबतची मोनिकाची वाढती जवळिकता हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चित मुद्दा ठरला आहे. मात्र अद्याप या दोघांनीही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Monica Bedi (@memonicabedi)

 

मोनिका आणि अझरुद्दीन सध्या अनेकदा सोबत फिरताना दिसत आहेत.त्यामुळे मीडिया जगतात त्यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. मोनिका आणि अझरुद्दीनची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेंडने करुन दिल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडेच मोनिकाने अझरुद्दीनच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.  दरम्यान, अभिनेत्री मोनिका बेदीला २००७ मध्ये खोटे पासपोर्ट बनवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.त्यानंतर अनेक काळ तिला तुरुंगात घालवावे लागले होते. आजही मोनिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

 

हे देखील वाचा