Saturday, September 21, 2024
Home टेलिव्हिजन शेर अकेला ही आता हैं… रीतेश कडून सूरजवर कौतुकाचा वर्षाव

शेर अकेला ही आता हैं… रीतेश कडून सूरजवर कौतुकाचा वर्षाव

बिग बॉस मराठीचा तिसरा आठवडा संपत आला आहे. हा आठवडा सुरज चव्हाणने विशेष गाजवला आहे. आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या भाउच्या धक्क्यात आता रितेश देशमुख सुरजची प्रशंसा करताना दिसतो आहे. या आठवड्यात सूरजने दमदार कामगिरी केली आहे.सूरज आधीचे दोन आठवडे तसा शांत होता. पण नंतर तो हळू हळू बोलायला लागला. या आठवड्यातील कॅप्टनसी टास्क मध्ये तर त्याने अगदी धुमाकूळ घातला. 

होस्ट रितेश देशमुख मात्र आजच्या भागात सूरजला बिनधास्त खेळायचा सल्ला देणार आहे. “ या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं की त्याला गेम काळात नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सर्वांना टफ फाईट दिली. झुंड में भेडीये आते हैं शेर अकेला ही आता हैं… 

तीन आठवड्यांत पहिल्यांदाच अरबाज च्या चेहर्यावर भीती दिसत होती. निक्की आणि जान्हवी देखील घाबरलेल्या दिसून आल्या. कोणालाही कमी लेखू नये हे यावेळी सिद्द झालंय. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका. अशा शब्दांत रितेश देशमुख सूरजला पाठबळ देताना आज दिसणार आहे.    

सूरजला खरतर सगळीकडून असाच जबरदस्त सपोर्ट मिळत आहे.  सर्वच स्तरातून त्याच्या खेळाची स्तुती केली जात आहे. सोशल मिडीयावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सूरज आता हा सपोर्ट कसा सुरु ठेवतो हे त्याच्या खेळावर अवलंबून आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

वीकेंडला करीना कपूरने साजरी केली नाईट डेट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा