बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘रेड 2’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. निर्मात्यांनी खूप आधी चित्रपटाची घोषणा केली होती, पण अजय देवगणच्या नायिकेचे नाव निश्चित झाले नव्हते. अजयसोबत वाणी कपूर दिसणार असल्याची बातमी अलीकडेच समोर आली आहे. त्याचवेळी, आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या खलनायकाच्या नावाला मान्यता दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया Raid 2 च्या खलनायकाबद्दल…
‘रेड 2’ देखील टी-सीरीजच्या बॅनरखाली बनत आहे. प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट शेअर केली असून रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत सहभागी झाल्याची माहिती दिली आहे. फोटो शेअर करत लिहिले, ‘टकरावासाठी तयार राहा. खलनायकाच्या भूमिकेत रितेश देशमुखचे स्वागत आहे. फोटोंमध्ये रितेश अजय देवगण, रवी तेजा, वाणी कपूर आणि रेड 2 च्या टीमसोबत दिसत आहे. रितेशचे चाहते या फोटोंवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत.
Get ready for a face-off! Riteish Deshmukh takes on the role of the antagonist in #Raid2.
Welcome, @Riteishd.????????In cinemas on 15th November 2024!@ajaydevgn @Vaaniofficial @rajkumar_rkg #BhushanKumar #KrishanKumar @KumarMangat @AbhishekPathakk @TSeries @PanoramaMovies… pic.twitter.com/Za88Plnbnl
— T-Series (@TSeries) January 12, 2024
‘रेड 2’मध्ये रितेश देशमुख पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर अजय देवगण विरुद्ध दिसणार आहे. या चित्रपटात दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. अजय देवगण ऑफिसर अमर पटनायकच्या भूमिकेत दिसणार असून त्याचे टार्गेट रितेश असेल. ‘रेड’ चित्रपटाचा पहिला भाग 1980 च्या दशकात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरदार इंदर सिंगवर टाकलेल्या वास्तविक जीवनातील आयकर छाप्यावर आधारित होता.
दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि निर्माते भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये होणार आहे. ‘रेड 2’ ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. अलीकडेच अजय देवगणनेही चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर केले आहेत. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
तरुणींच्या गळ्यातील ताईत सनम पुरी अडकला लग्नबंधनात, एक वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा
‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाचा पोस्टर समोर, तेजस्विनी पंडितच्या करारी लूकने वेधले लक्ष