आतापर्यंत अनेक भोजपुरी गायकांनी आपल्या आवाजाने भोजपुरी चित्रपटसृष्टीला हिट गाणी दिली आहेत. त्यांचे काही गाणी तर अशी असतात, जी काही क्षणातच व्हायरल होतात. यातीलच एक प्रसिद्ध गायक म्हणजे रितेश पांडे. रितेशने आपल्या गाण्यांनी इंटरनेटवर राडा घातला आहे. त्यामध्ये ‘चुनरी झलकउआ’ असो किंवा मग ‘हैलो कौन’ असो, ही गाणी चांगलीच गाजली आहेत. आता त्याचे असेच एक गाण्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्याचे हे गाणे जोरदार व्हायरल होत आहे.
रितेशचे ‘लवंडिया लंदन से लाएँगे’ हे गाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रिलीझ झाले होते. परंतु आजही या गाण्याला चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळतेय. कदाचित त्यामुळेच या गाण्याला आतापर्यंत १ कोटी ६५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या गाण्याला आर. एस. प्रितमने लिहिले आहे, तर या गाण्याला आशिष वर्मा यांनी म्युझिक दिले आहे. दुसरीकडे कोरिओग्राफी लक्की विश्वकर्मा तसेच दिग्दर्शन लवकेश विश्वकर्मा यांनी केले आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर दीड लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.
रितेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या या गाण्यावर २ महिन्यांपासून सातत्याने लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. आतापर्यंत ६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी यावर कमेंट केली आहे. रितेशच्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “इंडस्ट्रीमध्ये रितेश पांडेच सर्वोत्तम गायक आहे. हे गाणेही जबरदस्त आहे.”
दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “रितेश पांडेने काय भारी गाणं गायलंय. हे गाणं ऐकून मजा आली.” याव्यतिरिक्त आणखी एका चाहत्याने लिहिले की, “हे गाणे ऐकून मजा आली, अपेक्षा आहे की, लवकरच रितेश पांडेचे यासारखेच आणखी एक जबरदस्त गाणे रिलीझ होईल.”
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-