Saturday, June 29, 2024

चोर निघाला दिलदार! मणिकंदन यांच्या घरातून चोरीला गेलेला राष्ट्रीय पुरस्कार, चोराने माफी मागून परतवला

साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तमिळ निर्देशक मणिकंदन यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या घरातून काही सोन्याच्या वस्तूंसह त्यांना सन्मानित केलेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आता नवी माहिती समोर आली असून चोरांनी माफीनामा लिहित राष्ट्रीय पुरस्कार परत केल्याची बाब समोर आली आहे. नेमकी घटना काय जाणून घेऊ.

काही दिवसांपूर्वी, ‘कदैसी विवासयी’ या चित्रपटाचे निर्देशक मणिकंदन यांच्या मदुराई येथील घरात चोरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरलेले राष्ट्रीय पुरस्कारांचे पदक मणिकंदन यांना परत कर एक पत्र चोरांनी लिहीलं आहे.
चोरी झाल्यानंतर मणिकंदन यांनी उसिलमपट्टी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. एक लाख रुपये रोख, १५ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू गायब असल्याचे तक्रारीत त्यांनी उल्लेख केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना घराच्या भिंतीला एक पॉलिथिन पिशवी लटकलेली आढळली, ज्यामध्ये मणिकंदनचे राष्ट्रीय पुरस्कार पदक आणि माफीची चिठ्ठी होती. “सर, कृपया आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्या मेहनतीचे वेतन परत करत आहोत.” असे या चिठ्ठीत लिहिले होते.

मणिकंदन आपल्या परिवारासोबत चेन्नई येथे राहतात. त्यांचे पाळीवर कुत्रे मदुराई येथील उसिलामपट्टी घरात असते. त्यांच्या पाळीव कुत्र्याला मणिकंदन यांचा मित्र जेव्हा खाणं देण्यासाठी गेला तेव्हा घराच्या दरवाजासोबत छेडछाडी झाल्याचे मित्राच्या निर्दशनास आले. तेव्हा त्यांनी पाहिलं असता घराती महागड्या वस्तु चोरीला गेल्याचे समजले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री गळफास घेत संपवलं आयुष्य, कंगना रणौतसोबत केले होते काम
अक्षयच्या नव्या चित्रपटाची घोषणा, खिलाडी कुमार दिसणार ‘सरफिरा’ स्टाईलमध्ये, रिलीजची तारीख जाहीर

हे देखील वाचा