[rank_math_breadcrumb]

एका फोटोसाठी लिफ्टपर्यंत पोचले पॅप्स: पाठलाग बघून भडकली आलीया…

आलिया भट्ट शेवटची रोमँटिक कॉमेडी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंगसोबत दिसली होती. आजकाल अभिनेत्री वासन बाला दिग्दर्शित तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘द आर्चीज’ मधील अभिनेता वेदांग रैनानेही या चित्रपटात काम केले आहे. आता अलीकडेच आलियाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पॅप्सवर चिडताना दिसत आहे.

अलीकडेच आलिया एका इमारतीजवळ स्पॉट झाली होती. अभिनेत्री आपल्या कारमधून खाली उतरली आणि इमारतीच्या दिशेने जाऊ लागली. काही पापाराझीही आलियाच्या मागे गेले आणि इमारतीच्या आत पोहोचले. आलियाचे व्हिडिओ आणि फोटो घेण्यासाठी पॅप्स इमारतीच्या लिफ्टवर पोहोचले. हे पाहून ती भडकली.

तीच्या टीमने पापाराझीचे अनाहूत वर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला, तरीही ते फोटो काढण्यासाठी इमारतीत आणि लिफ्टमध्येही आलियाचा पाठलाग करतच राहिले. त्यानंतर आलियाने पापाराझींना फटकारले आणि म्हणाली , “तुम्ही काय करत आहात? ही एक खाजगी जागा आहे?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, अनेक वापरकर्ते आलियाचे कौतुक करताना दिसत आहेत, कारण तिने त्यांच्या गैरवर्तनाबद्दल पॅप्सला फटकारले आहे. एका वापरकर्त्याने लिहीले की, “पॅप्सने किमान कुठेतरी सीमा ठेवली पाहिजे. काही लोक केवळ काही निमित्ताने आपली मर्यादा ओलांडत आहेत. आलियाला येथे राग येण्याचे कारण नक्कीच आहे.” तर दुसरी म्हणाली, “ती तरीही शांतच होती, त्यांना काही अक्कल नाहीये. लिफ्टमध्ये पॅप्सही येतील का?”

दरम्यान, आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना, अभिनेत्रीचा जिगरा हा चित्रपट ११  ऑक्टोबर २०२४  रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि आलिया भट्टच्या इटर्नल सनशाईन प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी मला फोन करणारा फक्त सलमान होता; रेमो डिसुझाने सांगितली आठवण…

author avatar
Tejswini Patil