×

धनश्री वर्माच्या नवीन व्हिडिओने घातला धुमाकूळ, ‘गंगुबाई काठीयावाडी’च्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना बघत असतो. ती एक लोकप्रिय यूट्यूबर आहे. तसेच ती एक डॉक्टर देखील आहे. तिच्या डान्सची कला तर आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे. इंस्टाग्रामवर तिचे अनेक व्हिडिओ आपल्याला मिळतात. अशातच तिचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये धनश्री ‘गंगुबाई काठीयवाडी’च्या लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. व्हिडिओमध्ये धनश्रीने आलिया भट्टला कॉपी केले आहे. तिला या अवतारात पाहून चाहते हैराण झाले आहेत. तिचा अभिनय आणि लूक पाहून सगळेजण कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dhanashree Verma Chahal (@dhanashree9)

धनश्रीचे इंस्टाग्रामवर अनेक फॉलोवर्स आहेत. तिचा एक यूट्यूब चॅनल देखील आहे. ती प्रत्येक दिवशी तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. यूट्यूबवर तिचे २५ लाख सबसक्राईबर आहेत. धनश्री आणि क्रिकेटर युजवेंद्रचे लग्न २२ डिसेंबर २०२० मध्ये झाले.

‘गंगूबाई काठीयावाडी’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उतुसुक आहेत. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी आलिया भट्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा :

Latest Post