×

शेहनाझ गिलने साधला चाहत्यांशी संवाद, सिद्धार्थच्या आठवणीत चाहते पुन्हा एकदा झाले भावुक

बिग बॉस स्पर्धक शेहनाझ गिल तिच्या क्यूटनेसने सगळ्यांच्या मनावर नेहमीच राज्य करत असते. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि तिची केमेस्ट्री सगळ्यांना खूप आवडत होती. बिग बॉसच्या घरात असताना त्यांचं मैत्रीचं नातं खुललं होतं. परंतु सिद्धार्थच्या आकस्मिक मृत्यूने शेहनाझला खूप मोठा धक्का बसला. त्याच्या निधनानंतर ती अगदी सदम्यात गेली होती. ती शूटिंग, लोक या सगळ्यापासून दूर राहत होती. परंतु आता कुठे तिने तिचे हे एकटेपण सोडून दिले आहे आणि ती तिच्या करीअरवर लक्ष देत आहे. तिच्या मनातली सिद्धार्थची पोकळी कधीही भरू शकत नाही. असे तिने अनेकवेळा सांगितले आहे.

बऱ्याच दिवसानंतर शेहनाझ तिचा चाहत्यांशी बोलायला ट्विटवर आली होती. तिने रविवारी तिच्या चाहत्यांशी बातचीत केली. पण त्यानंतर तिचे चाहते खूपच भावुक झाले. तिने तिच्या चाहत्यांच्या सगळ्या ट्विटला रिप्लाय दिला आणि त्यांच्याशी संवाद साधला. (Shehnaaz gill made fans emotional on twitter people remembered Siddharth Shukla)

यावेळी तिच्या एका चाहत्याने ट्विट केले की, “मला रिप्लाय मिळो नाहीतर न मिळो मी माझ्या क्यूट शेहनाझवर प्रेम करत राहणार आहे.” यावर शेहनाझने रिप्लाय दिला की, “मी तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम करते.” दुसऱ्या एका युजरने गुलाबजामचा फोटो शेअर करत लिहिले की, “शेहनाझ रिप्लाय दे. नाहीतर की या गुलाबजामच्या पाकात बुडून जाईल.” यावर शेहनाझने रिप्लाय दिला की, “मी एवढी स्वीट आहे, मग या पाकाची काय गरज आहे.”

अशा प्रकारे तिने तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. बऱ्याच दिवसांनी तिने तिच्या चाहत्यांशी बातचीत केली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. बिग बॉसमध्ये असताना शेहनाझने याच क्यूटनेसने सगळ्यांची मने जिंकली होती.

शेहनाझ नुकतेच ‘बिग बॉस १५’ च्या ग्रँड फिनालेमध्ये दिसली होती. जिथे तिने सिद्धार्थ शुक्लाला खास श्रद्धांजली अर्पण केली होती. तिने त्याच्या निधनानंतर जे गाणे बनवले होते. त्याच गाण्यावर परफॉर्मन्स दिला होता. यावेळी सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाझ आणि सलमान खानच्या डोळ्यात पाणी आले होते.

हेही वाचा :

Latest Post