×

सिजेन खान ४४ व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात, गर्लफ्रेंडच्या हातची बिर्याणी खाल्यानंतर घातली थेट लग्नाची मागणी

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लग्नाचा सिझन चालू आहे. अनेक स्टार कपल या वर्षी लग्न करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अशातच ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता सिजेन खान देखील लग्न करणार आहे. वयाच्या ४४ वर्षी आजही सिजेन अविवाहित आहे. तो गेल्या तीन वर्षापासून अफसिनला डेट करत आहे. अशातच त्यांनी त्यांच्या नात्याला नवे नाव देण्याचा विचार केला आहे. सीजेन आणि अफसिन लवकर लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत. या गोष्टीची माहिती अभिनेत्याने त्याच्या एका मुलाखतीत दिली आहे.

सिजेनची गर्लफ्रेंड अफसिन मध्यप्रदेश मधील आहे. ते दोघेही याच वर्षी लग्न करण्याच्या तयारीत आहे सिजेनचे असे मत आहे की, लग्नाचे कोणतेही वय नसते आणि लग्नाचा निर्णय गडबडीत केला नाही पाहिजे.

सिजेन खानने लग्नाबाबत सांगितले की, “आम्ही गेल्या तीन वर्षापासून रिलेशनमध्ये आहोत, याचा मला आनंद आहे. जर ही महामारी नसती तर आतापर्यंत आम्ही लग्न केले असते. आता आम्ही या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहोत. मला असे वाटते की, लग्न करण्यासाठी कोणतेही वय नसावे.”

सिजेन अफसीनला भेटेपर्यंत सिंगल होता. याचे कारण सांगतात त्याने सांगितले की, “मला लग्न करण्याची घाई नव्हती. मी एका अशा व्यक्तीच्या शोधात होतो, जी इमानदार असेल. चांगले मूल्य जोपासणारी असेल. सोबतच तिने आमच्या नात्याचा आदर केला पाहिजे. त्यानंतर मला अफसिन भेटली.”

सिजेन खानाला त्याची गर्ल फ्रेंड आफसी न ने केलेली बिर्याणी खूप आवडते. एवढंच नाही तर त्याने अफसिनच्या हातची बिर्याणी खाल्यानंतर तिला प्रपोज केले होते. त्याने सांगितले आहे की, त्याने जगभरातील अनेक पदार्थ खाल्ले आहेत. परंतु अफसिनच्या हाताला जी चव आहे ती कशालाच नाही.”

सिजेन खान टीव्ही रिऍलिटी शो ‘कसौटी जिंदगी की’ मधून घराघरात पोहचला होता. त्यात त्याची आणि श्वेता तिवारी.ची जोडी सगळ्यांना खूप आवडली होती. त्या दोघांनी ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत देखील काम केले आहे.

हेही वाचा :

Latest Post