पहिल्यांदा टेलिव्हीजन व आता सिनेमात मोठं नाव झालेले रोनित रॉय ११ ऑक्टोबर २०२० रोजी आपला ५५वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलीवूडमध्ये ते वेगळ्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा भाऊ रोहित रॉय देखील टीव्ही कलाकार आहे. रोनित रॉय हे बंगाली परिवारातून आलेले आहेत. अहमदाबाद शहरात शिकेलेल्या रोनित रॉय यांनी शाळेतील शिक्षण संपल्यावर हॉटेल मॅनेजमेंट विषयात एक कोर्स केला होता. त्यानंतर ते मुंबई शहरात आले व सुभाष घई यांच्याकडे राहू लागले.
रोहित यांना कारकिर्द ही अभिनय क्षेत्रात घडवायची होती. परंतू एखादी भूमिका मिळणं तेवढं नक्कीच सोप्पं नव्हतं. चित्रपटात एवढं सहजासहजी काम मिळणं कठीण असल्याचं सुभाष घई यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर रोनित मुंबई शहरातील सी रॉक हॉटेलात काम करु लागले. त्या वेळी तेथे ते ट्रेनी म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी सी रॉक हॉटेलात भांडी धुण्यापासून टेबल साफ करण्याची कामं केली.
मोठा स्ट्रगल केल्यावर त्यांना १९९२मध्ये जान तेरे नाम मध्ये लीड रोल मिळाला. चित्रपट थोडा फार चालला परंतू रोनित रॉयंना करियरमध्ये त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांनी कमाल नावाच्या सिरीयलमधून टीव्ही करियरची सुरुवात केली. चित्रपटात रोल मिळत नसल्याने त्यांनी टीव्हीवर पुर्ण फोकस करण्याचा विचार केला.
याचदरम्यान त्यांना एकता कपूरच्या कसोटी जिंदगी की मालिकेत काम मिळाले. त्यानंतर एकता कपूरनेच त्यांना क्योंकी मध्ये लीड रोल दिला. अभिनयाबरोबरच रोनित रॉय यांची एक कंपनी आहे. तीचे नाव Ace Security and Protection agency असे आहे.
टेलिव्हीजन कलाकारांमध्ये रोनित रॉय हे सर्वात महागडे कलाकार आहेत. त्यांना अदालत शो मुळे पाठक नावानेही ओळखले जाते. रोनित रॉय यांची पर्सनल लाईफ देखील थोडी वेगळीच आहे. त्यांनी दोन लग्न केली आहेत. १९९१मध्ये त्यांनी पहिल्यांदा लग्न केले. त्या लग्नापासून त्यांना एक मुलगी आहे. पुढे त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २००३मध्ये त्यांनी निलम सिंग या अभिनेत्रीबरोबर लग्न केले. या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ
-डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा